IND vs AUS, 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु पहिल्या एकदिवसीय सामन्यातील ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला आहे. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 35.4 षटकांत सर्वबाद झाला आहे. सर्वजण मिळून केवळ 188 धावांच करु शकले असून भारतीय गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली आहे. विशेष म्हणजे एकदिवसीय क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियानं भारतासमोर केलेला हा सर्वात कमी स्कोर आहे. यावेळी भारताकडून वेगवान गोलंदाजद मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन तर जाडजाने 2 आणि पांड्या, कुलदीप यादव यांनी 1-1 विकेट घेतली आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शनं 81 धावांची एकहाती झुंज दिली. मुंबईच्या वानखेडे मैदानात (Wankhede Stadium) सुरु या सामन्यात आता विजयासाठी भारताला 50 षटकात 189 धावांची गरज आहे.
भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे आजचा सामना खेळत नाही. त्यामुळे हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आज कर्णधार म्हणून मैदानात उतरला आहे. प्रथमच तो एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरला असून त्याने आतापर्यंत चांगलं नेतृत्त्व केल्याचं दिसत आहे. कारण ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात त्याने अगदी चांगल्याप्रकारे गोलंदाजांना निवडलं. स्वत:ही चांगली गोलंदाजी करत स्टीव्ह स्मिथ सारखी महत्त्वाची विकेट घेतली.
शमी-सिराज जोडीची भेदक गोलंदाजी
तर सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाला कमी धावांत रोखून निर्धारीत लक्ष्य लवकरात लवकर पार करण्याचा डाव भारताने आखला. त्यानुसार आतापर्यंत तरी भारताने चांगली खेळी केली आहे. भारताने केवळ 188 धावांत ऑस्ट्रेलियाला रोखलं आहे. सर्वात आधी मोहम्मद सिराजनं विकेट्स घेण्यास सुरुवात केली. हेड यांना त्यानं अवघ्या 5 धावांत तंबूत पाठवलं. त्यानंतर मात्र मिचेल मार्श आणि कॅप्टन स्टीव्ह स्मिथनं एक चांगली भागिदारी केली. पण स्मिथ 22 धावांवर बाद झाल्यावर पुढील विकेट्सही पटापट पडत गेले. मार्श यानं सर्वाधिक म्हणजेच 65 चेंडूत 81 धावांची खेळी केली. त्यानं 10 चौकार आणि 5 षटकार ठोकले. पण इतर फलंदाज खास कामगिरी करु न शकल्याने ऑस्ट्रेलिया 35.4 षटकांत 188 धावांवर सर्वबाद झाली.
हे देखील वाचा-