IND vs AFG 3rd T20 Score Live: बेंगलोर येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरु असलेला तिसरा टी 20 सामना टाय झालाय. भारताने प्रथम फलंदाजी करताना चार विकेटच्या मोबदल्यात 212 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल अफगाणिस्तान संघानेही 20 षटकात 6 विकेट्सच्या मोबद्लायत 212 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. या सामन्याचा निकाल आता सुपरओव्हरमध्ये लागेल. भारताने पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवत आधीच मालिका खिशात घातली आहे. हा सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या इराद्याने अफागाण फौज मैदानात उतरली आहे. तर क्लीन स्वीप देण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. 


भारताने दिलेल्या 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने सडेतोड उत्तर दिले. अफगाणिस्तान संघाने 20 षटकात 6 विकेटच्या मोबदल्यात 212 धावा करत बरोबरी केली. आता सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये ठरवण्यात येणार आहे. अफगाणिस्तानकडून गुरबाज, जादरन, गुलबादिन नैब आणि मोहम्मद नबी यांनी झंझावती खेळी केली. भारताकडून फक्त वॉशिंगटन सुंदर याला प्रभावी मारा करता आला. तर गोलंदाज अपयशी ठरले. 



भारताने दिलेल्या 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाने वादळी सुरुवात केली. गुरबाज आणि जादरान यांनी 11 षटकात 93 धावांची सलामी दिली. दोघांनीही अर्धशतके ठोकली. गुरबाद याने 21 चेंडूत अर्धशतक ठोकले. यामध्ये चार षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. तर जादरान याने एक षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. दुलबादीन नैब याने अवघ्या 23 चेंडूत 55 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. मोहम्मद नबी यानेही 16 चेंडूत 34 धावांचं योगदान दिले. यामध्ये तीन षटकारांचा समावेश होता. 


अखेरच्या षटकात अफगाणिस्तान संघाला विजयासाठी 19 धावांची गरज होती. गुलाबदीन याने 18 धावा वसूल करत सामना बरोबरीत सोडला. भारताकडून मुकेश कुमार याला अखेरच्या षटकात 19 धावांचा बचाव करण्यात अपयश आले. 


 






दरम्यान, रोहित शर्माचं वादळी शतक आणि रिंकूंच्या विस्फोटक अर्धशतकाच्या बळावर भारताने 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 212 धावांचा डोंगर उभारला. रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधील पाचवे शतक ठोकले तर रिंकू याने पुन्हा एकदा अर्धशतकी तडाखा दिला. अफगाणिस्तानकडून फरीद याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. अफगाणिस्तानला अखेरचा टी 20 सामना जिंकण्यासाठी 213 धावांचे आव्हान मिळाले. अफगाणिस्तान संघाने 212 धावा करत बरोबरी केली.