U19 World Cup 2022: अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याला काहीच तास शिल्लक राहिले आहेत. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात आज संध्याकाळी 6.30 वाजता अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट मैदानावर (Sir Vivian Richards Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघ अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरीत पाचव्या जगज्जेतेपदापासून अवघा एक पाऊल दूर आहे. तर, इंग्लंडचा संघही दुसऱ्यांदा अंडर- 19 विश्वचषकाचा किताब जिंकण्यासाठी सज्ज झालाय. भारताच्या या ज्युनियर संघाच्या विजयासाठी लाखो क्रिकेटप्रेमी सोशल मीडियावर सतत पोस्ट करत आहेत. विराट कोहलीसह भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनी भारतीय अंडर-19 क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. 


याआधीही विराट भारताच्या भारतीय अंडर-19 क्रिकेट संघाशी बोलला आहे. अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली, तेव्हा कोहलीने संघातील खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संघाला अंतिम सामन्यासाठी आवश्यक टिप्स दिल्या. संघातील युवा खेळाडूंनी विराट कोहलीसोबतच्या या संवादाचे स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर शेअर केले होते. 







 


विराट कोहली अंडर-19 विश्वचषकही चॅम्पियन ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर-19 संघाने 2008 साली ही ट्रॉफी जिंकली होती. यानंतर त्याला आयपीएल आणि नंतर भारतीय संघात स्थान मिळालं.







 


भारत: यश धूल (कर्णधार), अंक्रिश रघुवंशी, हर्नुर सिंग, शेख रशीद, निशांत सिंधू, कौशल तांबे, दिनेश बाणा, राज बावा, विकी ओस्तवाल, राजवर्धन हंगर्गेकर, रवी कुमार, आराध्य यादव, सिद्धार्थ यादव, मानव प्रकाश, अनीश्वर गौतम, गर्व सांगवान.


इंग्लंड: टॉम प्रेस्ट (कर्णधार), जॉर्ज बेल, जॉर्ज थॉमस, जेकब बिथेल, जेम्स ऱ्यू, विल्यम लक्स्टन, रेहान अहमद, अ‍ॅलेक्स हॉर्टन, जेम्स सेल्स, थॉमस स्पिनवॉल, जोशुआ बॉयडेन, नॅथन बर्नवेल, जेम्स कोल्स, फतेह सिंग, बेंजामिन क्लिफ.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA