Asia Cup 2022 : श्रीलंका आणि पाकिस्तान(India vs Pakistan) या दोन संघामधील एक जण आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेच्या चषकावर नाव कोरणार आहे. दोन्ही संघाची स्पर्धेतील सुरुवात खास झाली नसतानाही त्यांनी अंतिम सामन्यापर्यंत धडक घेतली आहे. दरम्यान आता आशिया कप फायनलचा महामुकाबला दुबई आंतरराष्ट्रीय मैदानातच (Dubai International Stadium) होणार आहे. तर या सामन्यात मैदानाची स्थिती तसंच सामना होणाऱ्या ठिकाणचं हवामान कसं असेल, ते पाहूया... 


श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान Head To head


श्रीलंका आणि पाकिस्तान (Sri Lanka vs Pakistan) हे संघ टी20 क्रिकेटमधील दिग्गज संघ म्हणून ओळखले जातात. जर आशिया कपचा विचार केला तर दोघेही 16 वेळा आशिया कपच्या टी20 सामन्यांमध्ये आमने-सामने आलेले आहेत. यावेळी श्रीलंकेचं पारडं बहुतांश वेळा पाकिस्तानवर जड राहिलं आहे. श्रीलंका संघाने एकूण 11 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून पाकिस्तान केवळ 5 सामने जिंकण्यात यशस्वी राहिलं आहे. यंदाच्या आशिया कप 2022 स्पर्धेतही नुकत्याच सुपर 4 च्या सहाव्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला 5 गडी राखून मात दिली.


हवामानाची स्थिती कशी?


सामना होणाऱ्या मैदानातील हवामानाबद्दलच्या समोर येणाऱ्या माहितीनुसार दुबई आंतरराष्ट्रीय मैदानातील वातावरण साफ असणार आहे. दुबईत उष्ण वातावरण असल्याने याठिकाणीही ही उष्णता दिसून येईल. ज्यामुळे वातावरण 33 अंश सेल्सियस असणार आहे. तर वातावरणात 50 टक्के इतकी आर्द्रता असणार आहे. आतापर्यंत या मैदानात 82 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळवले गेले आहेत. 


कसे असू शकतात दोन्ही संघ?


संभाव्य पाकिस्तान 11


बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह  


संभाव्य श्रीलंका 11


दसुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, आशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वानंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, दिनेश चांदीमल.


हे देखील वाचा-