IND vs WI, 2nd T20, Warner Park Cricket Stadium : आज भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West indies) यांच्यात सेंट किट्स येथील वॉर्नर पार्क स्टेडियमवर दुसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना आहे. भारत आज पहिल्यांदाच या मैदानात सामना खेळणार असल्याने टीम इंडीया या ठिकाणी कशी कामगिरी करेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे या सामन्यात नेमकं कोणाचं पारडं जड असेल आणि कोण सामना जिंकून मालिकेत आघाडी घेईल हे पाहावं लागेलं. त्यापूर्वी मैदानाची स्थिती कशी असेल, ते पाहूया...


वॉर्नर पार्कमध्ये फलंदाजी करणं काहीसं अवघड असल्याने चेस करणाऱ्या संघाला अधिक फायदा होत असल्याचं दिसून आलं आहे. तसंच गोलंदाजांना अधिक मदत या पिचवर मिळत असल्याने आज देखील नाणेफेक जिंकणार संघ प्रथम गोलंदाजी निवडण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान बऱ्याच काळानंतर या मैदानावर सामना होत असल्याने एक फ्रेश खेळपट्टीवर दोन्ही संघ उतरतील त्यामुळे फलंदाजांना फायदा होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे एक चुरशीचा सामना आज क्रिकेट रसिंकाना पाहायला मिळेल.


दोन्ही संघाचा मैदानावरील इतिहास


आजचा सामना होणाऱ्या मैदानात भारत पहिलाच सामना खेळत आहे. दुसरीकडे वेस्ट इंडीजने मात्र याठिकाणी 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यातील 6 जिंकले देखील आहेत.याशिवाय दोन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला असून दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत.  



संभाव्य भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक, दीपक हुडा, हार्दीक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, रवी बिश्नोई.  


संभाव्य वेस्ट इंडीज संघ - काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार),  जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, ओडेन स्मिथ, ओबेद मकॉय, अल्झारी जोसेफ, हेडन वॉल्श, अकेल हुसेन.



हे देखील वाचा -