Ind vs SA 2nd Test : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. पण या महत्त्वाच्या सामन्यात भारताची सुरुवातच डळमळीत झाली आहे. भारताचा निम्मा संघ 116 धावांवर तंबूत परतला आहे. संघाचा कर्णधार आणि सलामीवीर केएल राहुल एकहाती झुंज देत होता मात्र 50 धावा होताच तोही बाद झाला आहे. विराट कोहली दुखापतीमुळे संघाबाहेर असल्यामुळे राहुलला संधी मिळाली त्याने संधीचे सोने करण्याचा प्रयत्नही केला पण अर्धशतक होताच तोही बाद झाला आहे. सध्या ऋषभ पंत आणि आर आश्विन क्रिजवर आहेत.



दोन्ही संघासाठी महत्त्वाचा सामना


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील हा दुसरा सामना भारतासह दक्षिण आफ्रिका अशा दोघांसाठी महत्त्वाचा आहे. कारण भार जिंकल्यास भारत पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या भूमित कसोटी मालिका जिंकेल. तर आफ्रिकेला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय महत्त्वाचा आहे.


13 वर्षानंतर कर्नाटकचा कर्णधार


विशेष म्हणजे तब्बल 13 वर्षानंतर कर्नाटकच्या खेळाडूला भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद मिळालं आहे. याआधी 1980 मध्ये गुंडप्पा विश्वनाथ यांनी 2 कसोटी सामने, तर 2003 ते 2007 पर्यंत राहुल द्रविडने 25 कसोटी सामने आणि 2007 ते 2008 मध्ये अनिल कुंबळेने 14 कसोटी सामन्यात भारताचं कर्णधारपद भूषवलं होतं. त्यानंतर आता चौथ्यांदा केएल राहुलच्या रुपात कर्नाटकच्या खेळाडूला हा सन्मान मिळाला आहे. दरम्यान कर्णधारपद मिळताच केएल राहुलने 'ही फार आनंदाची गोष्ट असून प्रत्येक खेळाडूचं हे स्वप्न असतं' असंही म्हणाला आहे.


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha