IND vs SA, 3rd ODI Pitch report : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात आज तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने तर दुसरा सामना भारताने जिंकला असून आज मालिकेतील अखेरचा पण निर्णायक सामना रंगणार आहे. निर्णायक कारण आजचा सामना जिंकणारा संघच मालिकाही जिंकणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम (Arun Jaitley Cricket Stadium) येथे सामना खेळवला जाणार आहे. आजचा सामना मालिकेतील विजेता समोर आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने अशा स्थितीत आजचा सामना होणाऱ्या मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) जाणून घेऊया...


अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी काहीशी धिमी असली तरी बाऊंड्रीज अधिक मोठ्या नसून आऊटफिल्डही क्विक असल्याने चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णयही संघ घेऊ शकतात. तसंच फिरकीपटूंना काही प्रमाणात मदत मिळण्याची शक्यता असल्याने भारत ही आपले स्टार फिरकीपटू मैदानात उतरवू शकतो. 


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका Head to Head Record


भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa ODI Record) यांच्यात आतापंर्यंत 89 एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी 51 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, दक्षिण आफ्रिका संघाला 35 सामने जिंकता आले आहेत. यातील तीन सामने अनिर्णित देखील सुटले आहेत. 


आजची लढत निर्णायक


तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने 9 धावांनी गमावला होता. ज्यामुळे मालिकेतील पहिला सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेने 1-0 ची आघाडी घेतली. ज्यानंतर दुसरा सामना भारताने 7 विकेट्सने जिंकत मालिकेत 1-1 ची बरोबरी घेतली आहे. ज्यानंतर आज होणारा तिसरा सामना जो संघ जिंकेल तो मालिकाही 2-1 ने खिशात घालणार आहे. 


संभाव्य भारतीय संघ


शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर.




हे देखील वाचा-