ENG vs IND : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात आज नॉटींगहम येथील ट्रेन्ट ब्रिज क्रिकेट स्टेडियमवर टी20 मालिकेतील तिसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे. पहिल्या टी20 मध्ये भारताने 50 धावांनी तर दुसऱ्या टी20 मध्ये 49 धावांनी विजय मिळवल्यानंतर आज तिसरा सामना खेळवला जात आहे.
कसा आहे पिच रिपोर्ट?
आज सामना होणाऱ्या नॉटींगहम येथील ट्रेन्ट ब्रिज क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टी सपाट असल्याने फलंदाजांना काही प्रमाणात अधिक फायदा होऊ शकतो. ज्यामुळे एक मोठी धावसंख्या उभी राहण्याची शक्यता आहे. तिनही क्रिकेट प्रकारच्या सामन्यात याठिकाणी मोठी धावसंख्या होताना दिसून आलं आहे. या मैदानावर 2012 मध्ये झालेल्या टी20 सामन्यानंतर थेट 2021 मध्ये पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड हा टी20 सामना पार पडला. तोवर याठिकाणी टी20 सामना पार पडला नव्हता. ज्यानंतर आता पुन्हा एक मोठा आणि महत्त्वाचा टी20 सामना याठिकाणी पार पडणार आहे. फलंदाजांसाठी खेळपट्टी फायद्याची असल्याननाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी घेण्याची अधिक शक्यता आहे.
भारताने कसा जिंकला सामना?
भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने 49 धावांनी एक दमदार विजय मिळवत मालिकेतही 2-0 ची विजयी आघाडी घेतली. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर 171 धावांते लक्ष्य ठेवले. पण इंग्लंडचा संपूर्ण संघ 121 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून भुवनेश्वर, बुमराह, चहलने उत्तम गोलंदाजी केली. या विजयामुळे भारताने मालिकाही खिशात घातली आहे.
भारताचा टी-20 संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, उमरान मलिक
हे देखील वाचा-
- Wimbledon 2022 Final: नोवाक जोकोविचला रॉजर फेडररचा आणखी एक विक्रम मोडण्याची संधी !
- India Tour Of Zimbabwe: वेस्ट इंडीजनंतर भारताचा झिम्बॉवे दौरा; कधी, कुठे रंगणार सामने? येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक
- IND vs ENG 2nd T20 : भारताचा इंग्लंडवर 49 धावांनी दमदार विजय, मालिकाही घातली खिशात, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर