मॅन्चेस्टर : विश्वचषकातील भारत-न्यूझीलंड संघादरम्यान पहिल्या उपांत्य सामन्याच्या वेळी पुन्हा एकदा खलिस्तानी समर्थक स्टेडियममध्ये दिसले. मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरील सामन्यात खलिस्तानी समर्थकही आले होते. त्यांच्या टीशर्टवर पंजाबबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला होता. मात्र सामना सुरु होण्याआधीच पोलिसांची नजर त्यांच्यावर गेली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं.
"स्टेडियमवरील सुरक्षारक्षक स्टॅण्डमध्ये गेले आणि कोणत्याही विरोधाशिवाय त्यांना बाहेर काढून पोलिसांकडे सोपवलं. तिथे चार सिख लोक होते. त्यांच्या टी-शर्टवर काहीतरी राजकीय संदेश होता आणि त्यासाठी परवानगी नाही," असं पोलिसांनी सांगितलं.
विश्वचषकात अनेक वेळा घोषणाबाजी
या विश्वचषकातील अनेक सामन्यांदरम्यान खलिस्तानी समर्थक गोंधळ घालताना दिसले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यावेळी स्टॅण्डमधील काही लोक खलिस्तान आणि पाकिस्तानचा झेंडा घेऊन 'पाकिस्तान जिंदाबाद' आणि 'खलिस्तान जिंदाबाज' अशी घोषणाबाजी करत होते. यापैकी सर्वाधिक व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिलेने दावा केला होता की ती अहमदाबादची आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अहमदाबाद पोलिसांची क्राईम ब्रान्च या प्रकरणी तपास करत आहे.
काय आहे खलिस्तान मोहीम?
पंजाबी भाषिक लोकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणीची सुरुवात पंजाबी सूबा आंदोलनापासून झाली होती. भाषेच्या आधारावर पंजाबला वेगळं दाखवण्याचा हा पहिला प्रयत्न होतं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अकाली दलाची स्थापना झाली आणि काही काळातच या पक्षाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. स्वतंत्र पंजाबसाठी मोठं आंदोलन झालं. अखेर 1966 मध्ये ही मागणी मान्य झाली आणि भाषेच्या आधारावर पंजाब, हरियाणा आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाची स्थापना झाली.
'खलिस्तान' म्हणून स्वायत्त राज्याच्या मागणीने 1980 च्या दशकात जोर धरला. हळूहळू ही मागणी वाढू लागली आणि याला खलिस्तान आंदोलन असं नाव देण्यात आलं. अकाली दल कमकुवत होण आणि 'दमदमी टकसाल'चे जरनेल सिंह भिंडरावालाची लोकप्रियता वाढण्यासोबत हे आंदोलन हिंसक होत गेलं.
ICC World Cup 2019 | भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान खलिस्तानी समर्थक पोलिसांच्या ताब्यात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jul 2019 01:51 PM (IST)
ICC World Cup 2019 : मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरील सामन्यात खलिस्तानी समर्थकही आले होते. त्यांच्या टीशर्टवर पंजाबबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -