एक्स्प्लोर

ICC World Cup 2019 | पाकिस्तान संघासह इंग्लंडच्या जोडगोळीला दंड

पाकिस्तानने इंग्लंडच्या डावात निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानी कर्णधार सरफराझ अहमदला मानधनाच्या वीस टक्के रकमेचा, तर अन्य खेळाडूंना मानधनाच्या दहा टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे.

world cup 2019 : पाकिस्तानने यजमान इंग्लंडला हरवून विश्वचषकात जबरदस्त कमबॅक केलं खरं, पण जिंकण्याच्या प्रयत्नांमध्ये पाकिस्तानचा कर्णधार सरफराझ अहमद आणि त्याच्या शिलेदारांचा खिसा मात्र फाटला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती संथ राखल्याप्रकरणी त्यांना आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. पाकिस्तानने इंग्लंडच्या डावात निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानी कर्णधार सरफराझ अहमदला मानधनाच्या वीस टक्के रकमेचा, तर अन्य खेळाडूंना मानधनाच्या दहा टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. दुसरीकडे, इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जोफ्रा आर्चर या दोघांनाही दंड सुनावण्यात आला आहे. बेशिस्त वर्तणुकीसाठी त्यांच्या मानधनाच्या पंधरा टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान संघांमधल्या विश्वचषक सामन्यात रॉय आणि आर्चर या दोघांनीही पंचांच्या निर्णयाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी दोघांनीही अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात झालेल्या पराभवाचं खापर खराब क्षेत्ररक्षणावर फोडलं आहे. इंग्लंडने सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात केली होती. त्या सामन्यात इंग्लंडचं क्षेत्ररक्षण खूपच कमालीचं झालं होतं. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने क्षेत्ररक्षणात अनेक चुका केल्या. जेसन रॉयने मोहम्मद हफिझचा अवघ्या चौदा धावांवर सोडलेला झेल इंग्लंडला भलताच भोवला. त्याने 84 धावांची खेळी उभारुन इंग्लंडच्या डावाला मजबूती दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhajiraje Chhatrapati : दिसेना स्मारक,राजे आक्रमक; छत्रपती संभाजीराजांचे सरकारला सवालDevendra Fadnavis Sambhajiraje Chhatrapati :स्मारकासाठी कोर्टातून स्थगिती मिळवणाऱ्या वकिलांना शोधावंABP Majha Headlines :  5 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Mumbai fire: रॉकेलचा कॅन अन् पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात घरभर पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
Nanded : सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
Embed widget