एक्स्प्लोर

ICC Womens T20 World Cup 2020 | सलामीच्या सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने

महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाला आजपासून ऑस्ट्रेलियात सुरुवात होत आहे. सिडनीच्या सलामीच्या साखळी सामन्यात भारतीय महिलांची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडेल. यंदाच्या विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया हेच दोन बलाढ्य संघ आहेत. त्याच दोन संघांत विश्वचषकाची फायनल होईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या साखळी सामन्याकडे फायनलची रंगीत तालीम म्हणून पाहिलं जात आहे.

सिडनी : हरमनप्रीत कौरची टीम इंडिया आणि एलिस पेरीची ऑस्ट्रेलियन फौज. या दोन तुल्यबळ संघांच्या लढतीने आयसीसीच्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं बिगुल वाजणार आहे. सिडनी क्रिकेट स्टेडियमवर उभय संघांमध्ये विश्वचषकाचा सलमीचा सामना खेळवण्यात येणार आहे. गेल्या विश्वचषकात उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागलेल्या भारतीय संघाने यंदा चांगलीच कंबर कसली आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाही आपलं विजेतपद कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

यंदाच्या विश्वचषकात भारताचा अ गटात समावेश आहे. या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेशचा समावेश आहे. या गटातून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. विश्वचषकाच्या या आव्हानाला सामोरं जाताना भारतीय संघाची मदार असेल ती प्रामुख्याने स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरवर. स्मृती आणि हरमनला ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटचा चांगलाच अनुभव आहे. बिग बॅशमध्ये या दोघीही अनुक्रमे ब्रिस्बेन हीट आणि सिडनी थंडर्स संघाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे स्मृती आणि हरमनकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. शेफाली वर्मा आणि मुंबईची जेमिमा रॉड्रिग्स या ताज्या दमाच्या फलंदाजांचं योगदानही मोलाचं ठरेल. तर दिप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूनम आणि राधा यादव यांच्यावर गोलंदाजीची भिस्त राहिल. 2017 च्या वन डे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आणि 2018 च्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताला विजेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली होती. पण यावेळी नव्या आत्मविश्वासाने स्पर्धेला सामोरं जाण्याचा मानस विश्वचषकासाठी निघण्यापूर्वी स्मृती मानधनाने एबीपी माझाकडे व्यक्त केला होता. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय महिलांना आजवर एकदाही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. त्यामुळे हरमनप्रीत कौरचा सध्याचा ते स्वप्न यंदा साकारणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut On BJP : भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक का झाली नाही? संजय राऊतांची टीकाCity 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDevendra Fadnavis Full Speech : कोकणाचा आशिर्वाद पुन्हा महायुतीलाच मिळेल,फडणवीसांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Embed widget