IND vs NZ : आयसीसी महिला विश्वचषकाच्या दुसऱ्याच सामन्यात भारताला न्यूझीलंडने 62 धावांनी मात दिली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला (Pakistan) मात दिल्यानंतर टीम इंडिया (Team India) विजयाची मालिका कायम ठेवू शकली नाही. दरम्या या पराभवाचं कारण कर्णधार मिथालीने सामन्यानंतर सांगितलं आहे.


मिताली म्हणाली, ‘‘आमच्या फलंदाजांना पहिल्या फळीत आणि मध्यक्रमात चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. समोरच्या संघाने 250 ते 260 रन केले असल्यास योग्य पद्धतीने खेळल्यास आम्हीही करु सकतो. पण सतत विकेट पडत असल्याने पराभवाचा सामना करावा लागला. मैदानात चेंडूला चांगली गती मिळत होती, पण फलंदाजीसाठीही पीच अधिक खराब नव्हता तरी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्याने भारत चांगली फलंदाजी करु शकला नाही.'' यावेळी मितालीने भारतीय गोलंदाजांचं कौतुक केलं. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 260 धावांत रोखलं ही चांगली कामगिरी होती, पण फलंदाजीत भारत कमाल करु न शकल्याने पराभव स्वीकारावा लागाला. 



असा पार पडला सामना


सेडन पार्क, हॅमिल्टन येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात चांगली झाली, परंतु न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईन आणि एमिलिया केर यांनी संघाची धुरा सांभाळली आणि त्यानंतर केरने एमी सथर्टवेटसोबत भागीदारी केली. न्यूझीलंड संघाने निर्धारित 50 षटकात 9 गडी गमावून 260 धावा केल्या. व्हाईट फर्न्सतर्फे एमी सथर्टवेटने 75 धावा केल्या, तर एमिलिया केरने 50 धावा केल्या. केटी मार्टिनने 41 आणि सोफी डिव्हाईनने 35 धावा केल्या. भारताकडून पूजा वस्त्राकरने 4, राजेश्वरी गायकवाडने 2 आणि झुलन गोस्वामी आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली. दुसरीकडे, 261 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. मिताली राज, यस्तिका भाटिया आणि शेवटी हरमनप्रीत कौर यांनी आशा दाखवल्या असल्या तरी संघ विजयी रेषेपासून लांब दिसत होता. भारताकडून हरमनप्रीत कौरने 63 चेंडूत 71 धावांची खेळी केली, तर कर्णधार मिताली राज 31 धावांवर बाद झाली. यास्तिकाने 28 आणि स्नेह राणाने 18 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ली ताहुहू आणि एमिलिया केर यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. हिली जेन्सनला दोन, जेस केर आणि हॅना रोवेला प्रत्येकी एक विकेट मिळाली. भारताचा संघ 46.4 षटकांत 198 धावांत आटोपला.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha