ICC Women's ODI Rankings: आयसीसीनं नुकतीच एकदिवसीय महिला गोलंदाजांची क्रमवारीका जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीनुसार, भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीला (Jhulan Goswami) मोठं नुकसान झालंय. या क्रमावारीत झुलन गोस्वामीची पाचव्या स्थानावरून घसरण झाली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या अयाबोंगा खाकानं पाचव्या स्थानावर झेप घेतली. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेची आणखी एक फलंदाज लॉरा वोल्वार्डनं आयर्लंडवर नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेतील क्लीन स्वीपमध्ये शानदार कामगिरी केली. ज्यामुळं लॉरा वोल्वार्ड क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर पोहचली आहे.
अॅलिसा व्हिली 785 गुणांसह अव्वल स्थानावर
डब्लिनमधील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात वोल्वार्डनं 89 धावांची शानदार खेळी खेळली. फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाची अॅलिसा व्हिली 785 गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. स्मृती मानधना 669 गुणांसह आठव्या क्रमांकावर कायम आहे. या यादीतील टॉप-10 मध्ये ती एकमेव भारतीय फलंदाज आहे. इंग्लंडची नताली शिव्हर दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी तिसऱ्या स्थानावर आहे.
ऑलराऊंडरच्या यादीत दीप्ती शर्मा सातव्या क्रमांकावर
आयसीसी गोलंदाज झुलन गोस्वामी एकमवे भारतीय गोलंदाज आहे, जी आयसीसी महिला गोलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-10 मध्ये आहे. त्यानंतर भारताची ऑलराऊंडर दीप्ती शर्मा 249 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेत नताली शिव्हर अव्वल स्थानावर कायम आहे.
हे देखील वाचा-