ICC Under-19 Women's T20 World Cup 2025 schedule : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) रविवारी (18 ऑगस्ट) अंडर-19 महिला टी-20 वर्ल्ड कप 2025 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धाचा थरार 18 जानेवारी 2025 पासून रंगणार आहे. गतविजेत्या भारताला वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि यजमान मलेशियासह अ गटात ठेवण्यात आले आहे. या 41 सामन्यांच्या स्पर्धेत 16 संघ सहभागी होतील आणि 2 फेब्रुवारी रोजी अंतिम सामना खेळला जाईल. 6-6 सामने अनेक दिवसांवर ठरलेले आहेत.
अंडर-19 महिला टी-20 वर्ल्ड कप 2025 चे सामने मलेशियातील चार ठिकाणी खेळवले जातील. सेलांगॉरमधील ब्युमास ओव्हल येथे गट अ चे सर्व सामने आणि अंतिम सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. जोहोर येथील दातो डॉ. हरजित सिंग जोहर क्रिकेट अकादमी (जेसीए ओव्हल) येथे गट ब चे सामने आयोजित करण्यात येणार आहे. तर सारवाकमधील बोर्नियो क्रिकेट ग्राउंडवर सी गटाचे आणि सेलंगोरमधील यूकेएम वायएसडी ओव्हल येथे गट डी चे सामने होतील.
कोणता संघ कोणत्या गटात...
अ गट : भारत, वेस्ट इंडिज, श्रीलंका, मलेशिया.
ब गट : इंग्लंड, पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका.
गट क : न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, आफ्रिका पात्रता, सामोआ.
ड गट : ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, आशिया पात्रता, स्कॉटलंड.
अंडर-19 वर्ल्ड कप 2025चे वेळापत्रक
18 जानेवारी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड, यूकेएम वायएसडी ओव्हल
18 जानेवारी : इंग्लंड विरुद्ध आयर्लंड, जेसीए ओव्हल, जोहर
18 जानेवारी : समोआ विरुद्ध आफ्रिका क्वालिफायर, सारवाक क्रिकेट ग्राउंड
18 जानेवारी : बांगलादेश विरुद्ध आशिया पात्रता, यूकेएम वायएसडी ओव्हल
18 जानेवारी : पाकिस्तान विरुद्ध यूएसए, जेसीए ओव्हल, जोहर
18 जानेवारी : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सारवाक क्रिकेट मैदान
19 जानेवारी : श्रीलंका विरुद्ध मलेशिया, ब्यूमास ओव्हल
19 जानेवारी : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, ब्यूमास ओव्हल
20 जानेवारी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, यूकेएम वायएसडी ओव्हल
20 जानेवारी : आयर्लंड विरुद्ध यूएसए, जेसीए ओव्हल, जोहर
20 जानेवारी : न्यूझीलंड विरुद्ध आफ्रिका क्वालिफायर, सारवाक क्रिकेट ग्राउंड
20 जानेवारी : स्कॉटलंड विरुद्ध आशिया पात्रता, यूकेएम वायएसडी ओव्हल
20 जानेवारी : इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, जेसीए ओव्हल, जोहर
20 जानेवारी : दक्षिण आफ्रिका विरुद्ध सामोआ, सारवाक क्रिकेट मैदान
21 जानेवारी : वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका, ब्यूमास ओव्हल
21 जानेवारी : भारत विरुद्ध मलेशिया, ब्यूमास ओव्हल
22 जानेवारी : बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड, यूकेएम वायएसडी ओव्हल
22 जानेवारी : इंग्लंड विरुद्ध यूएसए, जेसीए ओव्हल, जोहर
22 जानेवारी : न्यूझीलंड विरुद्ध सामोआ, सारवाक क्रिकेट मैदान
22 जानेवारी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध आशिया पात्रता, यूकेएम वायएसडी ओव्हल
22 जानेवारी : पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड, जेसीए ओव्हल, जोहर
22 जानेवारी : दक्षिण आफ्रिका विरुद्ध आफ्रिका क्वालिफायर, सारवाक क्रिकेट ग्राउंड
23 जानेवारी : मलेशिया विरुद्ध वेस्ट इंडिज, ब्यूमास ओव्हल
23 जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका, ब्यूमास ओव्हल
24 जानेवारी : B4 विरुद्ध C4, जेसीए ओव्हल, जोहर
24 जानेवारी : A4 विरुद्ध D4, जेसीए ओव्हल, जोहर
25 जानेवारी : सुपर सिक्स – B2 वि C3, यूकेएम वायएसडी ओव्हल
25 जानेवारी : सुपर सिक्स – B1 वि C2, सारवाक क्रिकेट मैदान
25 जानेवारी : सुपर सिक्स – A3 विरुद्ध D1, यूकेएम वायएसडी ओव्हल
25 जानेवारी : सुपर सिक्स – C1 वि B3, सारवाक क्रिकेट ग्राउंड
26 जानेवारी : सुपर सिक्स – A2 विरुद्ध D3, ब्युमास ओव्हल
26 जानेवारी : सुपर सिक्स – A1 वि D2, ब्युमास ओव्हल
27 जानेवारी : सुपर सिक्स – B1 विरुद्ध C3, सारवाक क्रिकेट मैदान
28 जानेवारी : सुपर सिक्स – A3 विरुद्ध D2, ब्युमास ओव्हल
28 जानेवारी : सुपर सिक्स – C1 वि B2, सारवाक क्रिकेट मैदान
28 जानेवारी : सुपर सिक्स – A1 विरुद्ध D3, ब्यूमास ओव्हल
29 जानेवारी : सुपर सिक्स – C2 वि B3, यूकेएम वायएसडी ओव्हल
29 जानेवारी : सुपर सिक्स – A2 विरुद्ध D1, यूकेएम वायएसडी ओव्हल
31 जानेवारी : उपांत्य फेरी 1, ब्युमास ओव्हल
31 जानेवारी : उपांत्य फेरी 2, ब्युमास ओव्हल
2 फेब्रुवारी: अंतिम, ब्यूमास ओव्हल
1 फेब्रुवारी हा उपांत्य फेरीसाठी आणि 3 फेब्रुवारी हा अंतिम फेरीसाठी राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे.