SA vs WI 2nd Test Highlights: वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 40 धावांनी विजय मिळवला. या विजयासह 1-0 अशा फरकाने दक्षिण आफ्रिकेने मालिकाही जिंकली. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. 






गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर वेस्ट इंजिड आणि दक्षिण अफ्रिका यांच्या (WI vs SA) खेळवण्यात आलेल्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 160 धावांत गारद झाला. त्यानंतर पहिल्या डावात उतरलेल्या वेस्ट इंडिजचा डाव 144 धावांवर आटोपला. दोन्ही संघांच्या पहिल्या डावात गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. त्यानंतर दुसऱ्या डावात आफ्रिकेचा संघ 246 धावांत सर्वबाद झाला आणि वेस्ट इंडिजला विजयासाठी 263 धावांचे लक्ष्य दिले.


लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची फरफट-


लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली होती, पण हळूहळू दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. वेस्ट इंडिजला पहिला धक्का मायकेल लुईसच्या (04) 12 धावांवर बसला. यानंतर संघाने 54 धावांवर कर्णधार क्रेग ब्रॅथवेटच्या रूपाने दुसरी विकेट गमावली. क्रेग ब्रॅथवेटने 25 धावांची खेळी खेळली. त्यानंतर 103 धावांच्या स्कोअरवर वेस्ट इंडिजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आणि 104 धावांच्या स्कोअरवर टीमने सहावी विकेट गमावली. वेस्ट इंडिजचे फलंदाज झटपट बाद होत राहिले आणि अखेरीस 222 धावांवर सर्वबाद होऊन सामना गमवावा लागला.






आफ्रिकन गोलंदाजांची धमाकेदार कामगिरी-


लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी वेठीस धरले. यादरम्यान आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि फिरकी गोलंदाज केशव महाराज यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय विआन मुल्डर आणि डॅन पिएड यांनी 2-2 विकेट घेतल्या. विआन मुल्डरला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कसोटी मालिकेनंतर दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्या टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. 


WTC च्या गुणतालिकेत टीम इंडिया पहिल्या स्थानावर-


भारतीय क्रिकेट संघ 9 मॅचपैकी 6 मॅच जिंकत 68.51 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारतानंतर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया असून त्यांनी 12 पैकी 8 मॅच जिंकल्या असून त्यांचे गुण 62.5 इतके आहेत. भारतानं यापूर्वी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, भारताला विजेतेपद मिळवण्यात अपयश आलं होतं. पहिल्या दोन स्थानांवर असलेले संघ अंतिम सामना खेळतील.


संबंधित बातमी:


Samit Dravid Six : राहुल द्रविडचा पोरगाही क्रिकेटमध्ये करणार धमाका? डिव्हिलियर्ससारख्या स्फोटक शैली ठोकतोय षटकार - Video