ICC Test rankings : खेळ हा कधीच खेळाडूच्या वयावर अवलंबून नसतो असं म्हणतात. जेम्स अॅंडरसन (James Anderson) हे क्रिकेटमधील याचंच उदाहरण आहे. नुकतीच आयसीसीने (ICC) नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये गोलंदाजांच्या यादीत अँडरसनला अव्वल स्थान देण्यात आलं आहे. जेम्स अॅंडरसनला 866 रेटिंगसह पहिलं स्थान मिळवलं आहे.
कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत जेम्स अँडरसनने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर, रविचंद्रन अश्विननेही दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत अप्रतिम कामगिरीचा फायदा अँडरसनला मिळाला आहे, तर अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरीचं बक्षीस मिळालं आहे. मात्र, अँडरसन आणि अश्विनला मिळालेल्या या फायद्यात पॅट कमिन्सला फटका बसला आहे. तो आता पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
जेम्स अँडरसन कसोटीत नंबर वन गोलंदाज ठरला
कसोटीतील नंबर वन फलंदाजीबद्दल बोलायचे तर मार्नस लॅबुशेनने नंबर वनची जागा कायम राखली आहे. त्याचं रेटिंग 912 आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने फारशी चांगली कामगिरी केली नसली तरी त्याने त्याची जागा मात्र राखली आहे. स्टीव्ह स्मिथी दुसऱ्या क्रमांकावर आणि बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण, या रेटिंगमध्ये सर्वात मोठा झालेला बदल म्हणजे इंग्लंडचा जेम्स अँडरसन कसोटीत नंबर वन गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत पहिल्या क्रमांकाची जागा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने घेतली होती, मात्र तो आता थेट तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. त्याचबरोबर रवींद्र जाडेजानेही टॉप 10 मध्ये आपलं स्थान मिळवलं आहे. रवींद्र जाडेजा नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :