Harmanpreet Kaur On WT20 WC : महिला टी-20 वर्ल्ड कप (Womens T20 World Cup) स्पर्धेत भारतीय संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघाचा मुकाबला ऑस्ट्रेलियाच्या संघाशी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ सर्वोत्तम कामगिरी करण्यास सज्ज आहोत. आम्ही सर्वजण या सामन्यात 100 टक्के योगदान देऊ, असा विश्वास भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) व्यक्त केला आहे. 


Harmanpreet Kaur : सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न 


टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आमच्या संघानं खूप मेहनत घेतली आहे. आता आमचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. या सामन्यात आमचा संघ शंभर टक्के योगदान देईल. सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती हरमनप्रीत कौरने दिली आहे. आयर्लंडविरुद्धच्या विजयानंतर पत्रकार परिषदेत हरमनप्रीत कौर बोलत होती. आयर्लंडविरुद्ध खेळणे नेहमीच मजेदार असते. या सामन्यात आमच्यासमोर 'करो या मरो'ची स्थिती होती. यामध्ये आमच्यासमोर सर्वोत्तम खेळ करण्याचे आव्हान होते, असेही हरमनप्रीत कौर म्हणाली.


भारतीय संघानं आयर्लंडचा 5 धावांनी केला पराभव


टीम इंडियाने महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात आयर्लंडचा 5 धावांनी पराभव केला. या विजयानंतर भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली. आयर्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 155 धावा केल्या. अशाप्रकारे आयर्लंडला सामना जिंकण्यासाठी 156 धावांची गरज होती, मात्र पावसामुळे खेळ पूर्ण होऊ शकला नाही. पावसामुळं खेळ थांबला तेव्हा आयर्लंडच्या संघाने 8.2 षटकांत 2 बाद 54 धावा केल्या होत्या. आयरिश संघ डकवर्थ लुईस टार्गेटच्या 5 धावांनी मागे होता. अशाप्रकारे भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार हा सामना पाच विकेटने जिंकला.


स्मृती मंधानाने सर्वाधिक 87 धावांची खेळी


प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकांत 156 धावांपर्यंत मजल मारली होती. टीम इंडियाकडून सलामी फलंदाज स्मृती मंधानाने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली. स्मृतीने 56 चेंडूत 9 चौकार आणि तीन षटकारांसह धावांचा पाऊस पाडला. स्मृतीच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दमदार फलंदाजी करणाऱ्या स्मृती मंधानाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Women T20 World Cup : भारतासह तीन संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश, पाहा गुणतालिकाची स्थिती