ICC Test Ranking : आयसीसीने टेस्ट रॅकिंगमध्ये फलंदाजांची आणि गोलदाजांची नवी क्रमवारी जाहीर केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या फलंदाजांच्या नव्या क्रमवारीनुसार न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. केन विल्यमसनने स्टिव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांना मागे टाकून पहिलं स्थान पटकावलं आहे. या नव्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ तिसऱ्या स्थानावर आहेत.
न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन 890 गुणांसह पहिल्या स्थानावर असून भारतीय कर्णधार विराट कोहलीने 879 गुणांसह दुसर्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्मिथची पहिल्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
याव्यतिरीक्त दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. आयसीसीने टेस्ट रॅरकिंगमध्ये रहाणे 784 गुणांसह सहाव्या स्थानी पोहचला आहे. तर चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीत घसरण झाली असून तो 728 गुणांसह दहाव्या स्थानी पोहचला आहे.
गोलंदाजांच्या यादीत पॅट कमिन्स अव्वल
आयसीसीच्या नव्या टेस्ट रॅरकिंगनुसार कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स 906 गुणांसह गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. कमिन्सनंतर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड 845 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे, तर न्यूझीलंडचा नील वॅग्नर 833 गुणांसह या तिसऱ्या स्थानावर कायम आहे.
आश्विन-बुमराहच्या क्रमवारीत सुधारणा
आयसीसीच्या क्रमवारीनुसार भारताचा गोलंदाज रविचंद्रन आश्विनच्या क्रमवारीत दोन अंकांनी सुधारणा झाली असून तो सातव्या स्थानी पोहचला आहे. याचसोबत जसप्रीत बुमराहच्या क्रमवारीत एका अंकाने सुधारणा झाली असून तो नवव्या स्थानी पोहचला आहे.