ICC Test Ranking: टॉप 10 गोलंदाजांमध्ये अश्विन-बुमराहला स्थान; तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये जाडेजा-अश्विनचा समावेश
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड 839 गुणांसह दुसर्या आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनर 835 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
ICC Test Ranking : आयसीसीने काल जाहीर केलेल्या टेस्ट रँकिंगमध्ये गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या दोन खेळाडूंचा समावेश आहे. भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन 760 गुणांसह आठव्या आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 757 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स 908 गुणांसह अव्वल स्थानी आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड 839 गुणांसह दुसर्या आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनर 835 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
टॉप 10 कसोटी गोलंदाज
1. पीट कमिन्स 2. स्टुअर्ट ब्रॉड 3. नील वॅगनर 4. जोश हेजलवूड 5. टीम साऊदी 6. जेम्स अँडरसन 7. कसिगो रबाडा 8. रवीचंद्रन अश्विन 9. जसप्रीत बुमराह 10. जेसन होल्डर
James Anderson has jumped one spot to No.6 in the @MRFWorldwide ICC Test Player Rankings for bowling 📈 Full list: https://t.co/m1fyaVsU2B pic.twitter.com/173TqvXM0a
— ICC (@ICC) January 30, 2021
अष्टपैलू बेन स्टोक्स अव्वल स्थानी
इंग्लंडच्या बेन स्टोक्सने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत 427 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारताकडून रवींद्र जडेजा 419 गुणांसह तिसर्या आणि अश्विन 281 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर 423 गुणांसह दुसर्या स्थानावर आहे.
विराटची घसरण, टॉप 10 मध्ये भारताचे तीन खेळाडू
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने न खेळल्यामुळे कोहलीला टेस्ट रँकिंगमध्ये फटका बसला आहे. विराट कोहली 862 गुणांसह तिसर्या स्थानावरुन चौथ्या स्थानी घसरला आहे. पहिल्या स्थानावर असलेल्या केन विल्यमसनचे 919 पॉईंट्स आहेत, तर स्टीव्ह स्मिथ 891 पॉईंट्ससह दुसर्या क्रमांकावर आहेत. तर मार्नस ल्युबसन 878 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट 823 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
अन्य भारतीय खेळाडूंमध्ये चेतेश्वर पुजारा 760 पॉईंट्ससह गुणांसह सातव्या स्थानावरुन सहाव्या स्थानी आला आहे. तर अजिंक्य रहाणेने 748 गुणांसह एका स्थानाच्या फायद्यासह आठव्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत 13 व्या आणि सलामीवीर रोहित शर्मा 18 व्या स्थानावर कायम आहेत.
ICC ODI Ranking: आयसीसी रँकिंगमध्ये विराट-रोहित टॉपवर कायम; जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानावर
ICC ODI Ranking: टॉप 5 फलंदाज
1. विराट कोहली (भारत) 2. रोहित शर्मा (भारत) 3. बाबर आजम (पाकिस्तान) 4. रॉस टेलर (न्यूझीलंड) 5. अॅरॉन फिन्च (ऑस्ट्रलिया)
ICC ODI Ranking: टॉप 5 गोलंदाज
1. ट्रेन्ट बाउल्ट (न्यूझीलंड) 2. मुजीब उर रेहमान (अफगाणिस्तान) 3. जसप्रीत बुमराह (भारत) 4. मेहंदी हसन (बांगलादेश) 5. अॅरॉन फिन्च (ऑस्ट्रेलिया)