Suryakumar yadav in T20 Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने (ICC) गुरुवारी T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आयसीसीने जारी केलेल्या टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर सलामीवीर ईशान किशनच्या (Ishan Kishan) क्रमवारीत सुधारणा झाली आहे. याशिवाय, हार्दिक पांड्याने टी-20 अष्टपैलूंच्या यादीत तिसरे स्थान मजबूत केले आहे. तर नेमकी ही ताजी क्रमवारी कशी आहे जाणून घेऊ...


आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत सूर्यकुमार यादव पहिल्या स्थानावर आहे. सूर्याच्या नावावर 883 रेटिंग गुण आहेत. तर टीम इंडियाचा सलामीवीर ईशान किशन 10 स्थानांची झेप घेत 23व्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्ध धडाकेबाज खेळी करणाऱ्या दीपक हुडाने टॉप-100 फलंदाजांमध्ये प्रवेश केला आहे. सध्याच्या क्रमवारीत तो 97व्या स्थानावर आहे. याशिवाय अष्टपैलूंच्या श्रेणीत हार्दिक पंड्या 209 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे.


ताज्या T20 क्रमवारीत कोण कुठे?


आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत सूर्यकुमार यादव 883 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्याशिवाय पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान 836 गुणांसह दुसऱ्या, न्यूझीलंडचा डेव्हन कॉनवे 788 गुणांसह तिसऱ्या, पाकिस्तानचा बाबर आझम 778 गुणांसह चौथ्या, दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम 748 गुणांसह पाचव्या, इंग्लंडचा डेव्हिड मलान 719 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स 699 गुणांसह सातव्या, दक्षिण आफ्रिकेचा रिले रुसो 693 गुणांसह आठव्या, ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच 680 गुणांसह नवव्या आणि श्रीलंकेचा पाथुम निसांका 655 गुणांसह 10व्या स्थानावर आहे.


आज पुन्हा टीम इंडिया मैदानात


भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 (India vs Sri Lanka T20 Series) मालिकेतील दुसरा सामना आज 5 जानेवारीला होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA Cricket Stadium) होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मालिका जिंकण्याच्या हेतूने आज मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, मालिकेत टिकण्यासाठी श्रीलंकेला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. दरम्यान यामुळे आज देखील टीम इंडियाच्या खेळाडूंना शानदार टी20 खेळ करण्याची संधी असून आपली रँकिंग सुधारण्याची संधी आहे.


हे देखील वाचा-