मुंबई : टीम इंडियाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने आपल्या ग्लोव्ह्जवर लावलेला सेनादलाचा बलिदान बॅज काढून ठेवावा, अशी विनंती आयसीसीने बीसीसीआयला केली आहे. भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात धोनीने पॅरा कमांडोजच्या युनिफॉर्मवर दिसणारा बलिदान बॅज आपल्या ग्लोव्हजवर लावला होता.
भारताच्या माजी कर्णधाराच्या मनात भारतीय सेनादलाविषयी आदराची भावना आहे. सेनादलाच्या पॅरा रेजिमेंटने त्याला मानद लेफ्टनंट कर्नलचा हुद्दा देऊन सन्मानितही केलं आहे. धोनीने विश्वचषक सामन्यात बलिदान बॅज असलेले ग्लोव्हज वापरुन भारतीय सेनादलाविषयीची आपल्या मनातली भावना पुन्हा अधोरेखित केली.
धोनीच्या या कृतीची भारतीय चाहत्यांकडून खूपच प्रशंसा होत आहे. पण तो बॅज वापरणं नियमात बसत नसल्याचं सांगून, आयसीसीने धोनीला तो बॅज काढून ठेवायला सांगण्याची विनंती बीसीसीआयला केली आहे. यावर धोनी काय करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टीम इंडियाने विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विजयी सलामी दिली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून मात केली. दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांत केवळ 227 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने 48 षटकांत चार गडी गमावत हे आवाहन सहज पार केलं.
धोनीने ग्लोव्ह्जवरील सैन्याचा बलिदान बॅज काढावा, आयसीसीची विनंती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jun 2019 02:28 AM (IST)
सैन्याचा बलिदान बॅज वापरणं नियमात बसत नसल्याचं सांगत धोनीला तो बॅज काढून ठेवायला सांगण्याची विनंती आयसीसीने बीसीसीआयला केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -