Imad Wasim On PCB : पाकिस्तानचा (Pakistan Cricket Team) दिग्गज ऑलराउंडर इमाद वसिम (Imad Wasim) याला पीसीबीकडून यंदा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीने (PCB) काही दिवसांपूर्वीच निवडक खेळाडूंसाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केलं. यावेळी संघातील स्टार ऑलराउंडर इमाद वसीम याला (Allrounder Cricketer Imad Wasim) कॉन्ट्रॅक्ट मिळालेल्या खेळाडूंच्या यादीमधून ड्रॉप करण्यात आलं आहे. पीसीबीच्या या निर्णयानंतर इमाद बोर्डावर भडकला असून, 'माझं कॉन्ट्रॅक्ट ड्रॉप करण्याबाबत कोणतंही नेमकं कारण सांगितलं नाही.' असंही म्हणाला आहे.


2021 साली झालेल्या टी20 विश्वचषकानंतर (T20 World Cup 202( इमाद वसीमला पाकिस्तान संघात स्थान मिळालेलं नाही. ज्यानंतर आता त्याचं सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्ट देखील वाढवण्यात आलेलं नाही. त्यामुळेच इमाद वसिमने नाराजी व्यक्त केली असून यावेळी 'माझं कॉन्ट्रॅक्ट ड्रॉप करण्याबाबत कोणतंही नेमकं कारण दिलेलं नाही' अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे. 


'पीसीबीच्या या निर्णयाशी मी सहमत नाही'


इमाद वसीमने (Imad Wasim) आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, तो टी20 वर्ल्ड कप 2021 (T20 World Cup) नंतर एकही सामना पाकिस्तान संघाकडून खेळलेला नाही. यामागे काय कारण आहे, हे मला माहित नाही. त्यानंतर आता माझं सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टही वाढवण्यात आलेलं नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयाशी मी सहमत नाही, असंही इमाद म्हणाला आहे.


हे देखील वाचा-