ICC ODI Team Of The Year 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने (ICC) वनडे टीम ऑफ द ईयर (ODI Team Of The Year) संघाची घोषणा केली आहे. आयसीसीने निवडलेल्या संघामध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसतोय. 11 खेळाडूमध्ये भारताचे सहा खेळाडू आहेत. रोहित शर्माला आयसीसीने या संघाचा कर्णधार म्हणून निवडले आहे. त्याशिवाय विराट कोहलीसह अन्य सहा खेळाडूंना स्थान दिलेय. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासिवाय मोहम्मद सिराज, मोहम्मद शामी आणि कुलदीप यादव यांना स्थान मिळाले आहे. 


कोणत्या खेळाडूंना मिळाली आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयर संघात स्थान - 


आयसीसीने निवडलेल्या वनडे टीम ऑफ द ईयर संघामध्ये रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावर सलामीची जबाबदारी सोपवली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज ट्रेविस हेड याला तिसऱ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. तर चौथ्या क्रमांकावर भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला निवडले आहे. पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडचा अष्टपैलू डॅरेल मिचेल याला संधी दिली आहे. विकेटकिपर म्हणून आयसीसीने दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेन याला निवडले आहे. त्यासोबत दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मार्को यान्सन याला निवडले आहे.


भारताचे तीन गोलंदाज - 


आयसीसीने निवडलेल्या संघात भारतीय संघाचे तीन गोलंदाज आहेत. यामध्ये मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शामी यांना संधी मिळाली आहे. तर फिरकीपटू कुलदीप यादव यालाही निवडले आहे. जसप्रीत बुमराह याला आयसीसीने संधी दिली नाही. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम झम्पा याला दुसरा फिरकी गोलंदाज म्हणून निवडले आहे. 


कोणत्या देशाच्या किती खेळाडूला संधी मिळाली ?


आयसीसीने निवडलेल्या संघात दोन फिरकी गोलंदाज आहेत. कुलदीप यादव आणि अॅडम झम्पा यांना आयसीसीने फिरकीची जबाबदारी दिली आहे. त्याशिवाय वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शामी यांच्यावर आहे. त्यांच्याजोडीला मार्को यान्सन असेल. आयसीसीने निवडलेल्या वनडे टीम ऑफ द ईयर संघामध्ये भारताच्या सर्वाधिक खेळाडूंचा समावेश आहे. या संघात भारताचे सहा खेळाडू आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दोन दोन खेळाडूंना निवडलेय. तर न्यूझीलंड संघाचा एक खेळाडू आहे. 


पाकिस्तानचा एकही खेळाडू नाही - 


आयसीसीने निवडलेल्या वनडे टीम ऑफ द ईयर संघामध्ये पाकिस्तानचा एकही खेळाडू नाही. त्याशिवाय इंग्लंड, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका या संघातील एकाही खेळाडूला स्थान मिळवता आले नाही. 


आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयर 2023-


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ट्रेविस हेड, विराट कोहली, डेरिल मिचेल, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), मार्को यॉन्सन, अॅडम जम्पा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.






आणखी वाचा :


रोहित शर्मानं वांद्र्यातलं अपार्टमेंट दिलं भाड्यानं, महिन्याला मिळणार 3 लाख रुपये