ICC Ranking : आयसीसीने सध्याची कसोटी रँकिग (ICC Test Ranking) जाहीर केली असून गोलंदाजीनंतर फलंदाजीमध्येही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. यावेळी कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या फलंदाजांमध्ये केएल राहुलने कमालीची  झेप घेतली असून 18 स्थानांच्या फायद्याने तो 31 व्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही टॉप 10 मध्ये आहेत. मार्नस लाबुशेनने 915 गुणांसह पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. तर नेमकी यादी कशी आहे यावर एक नजर फिरवूया...


ICC Test Ranking : 



  1. मार्नस लाबुशेन (915गुण)

  2. जो रुट (900 गुण)

  3. केन विल्यमसन (879 गुण)

  4. स्टीव्ह स्मिथ (877 गुण)

  5. रोहित शर्मा (789गुण)

  6. डेव्हिड वॉर्नर (780 गुण)

  7. डी. करुनारत्ने (754 गुण)

  8. बाबर आजम (750 गुण)

  9. विराट कोहली (747 गुण)

  10. ट्रेव्हीस हेड (731 गुण)


गोलंदाजांची ICC Test Ranking : 



  1. पॅट कमिन्स (902गुण) 

  2. आर आश्विन (873 गुण)

  3. शाहीन आफ्रिदी (822 गुण)

  4. टी साऊदी (814 गुण)

  5. जेम्स अँडरसन (813 गुण)

  6. कागिसो रबाडा (810 गुण)

  7. जोश हेझलवुड (802 गुण)

  8. नील वॅगनर (794 गुण)

  9. जसप्रीत बुमराह (781 गुण) 

  10. मिशेल स्टार्च (778 गुण)


हे ही वाचा -



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live