T20 World Cup 2022 Prize Money: आस्ट्रेलिया पुढच्या महिन्यापासून रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, आयसीसीनं मोठ्या स्पर्धेसाठी बक्षीस रक्कमेची यादी जाहीर केलीय. या स्पर्धेत एकूण 5.6 दशलक्ष बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे 45.66 कोटी इतकी आहे. या स्पर्धेतील विजेता संघाला 1.6 मिलियन म्हणजेच जवळपास 13 कोटी रुपये मिळतील. तर, रनरअप संघाला सुमारे 6.5 कोटी रुपयांचं बक्षीत दिलं जाईल.

दरम्यान, येत्या 16 ऑक्टोबरपासून खेळल्या जाणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकात एकूण 16 संघ दम दाखवतील. जवळपास एक महिना ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत होणाऱ्या संघासाठी  4 लाख यूएस डॉलर दिले जातील. तर, सुपर 12 मधून बाहेर पडलेल्या 8 संघांमधील प्रत्येक संघाला 7 हजार अमेरिकन डॉलर्स मिळणार आहेत.

टी-20 विश्वचषकातील बक्षीसांची संपूर्ण यादी:

संघ बक्षीस भारतीय चलनानुसार
विजेता 1.6 मिलियन डॉलर जवळपास 13 कोटी
उप- विजेता 0.8 मिलियन डॉलर जवळपास 6.5 कोटी
सेमीफायनलमध्ये पराभूत झालेला संघ 0.4 मिलियन डॉलर जवळपास 3.26 कोटी
सुपर-12 मध्ये प्रत्येक सामना जिंकणारा संघ 40 हजार डॉलर जवळपास 33.62 लाख
सुपर-12 मधून बाहेर पडणारा प्रत्येक संघ 70 हजार डॉलर जवळपास 57.09 लाख
पहिल्या फेरीत प्रत्येक सामना जिंकणारा संघ 40 हजार डॉलर जवळपास 33.62 लाख
पहिल्या फेरीतून बाहेर पडलेला संघ 40 हजार डॉलर जवळपास 33.62 लाख

भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने
आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरू होईल. पहिल्या फेरीत वेस्ट इंडिज, श्रीलंकेसह एकूण 8 संघ भाग घेणार आहेत. यापैकी 4 संघ सुपर 12 साठी पात्र ठरतील. गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात 22 ऑक्टोबर रोजी सुपर 12 चा पहिला सामना खेळला जाईल. तर, भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

हे देखील वाचा-