Road Safety World Series 2022: रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 च्या पहिल्या सेमीफानलच्या रोमहर्षक सामन्यात इंडिया लीजेंड्सनं ऑस्ट्रेलिया लीजेंड्सचा पाच विकेट्सनं पराभव करत फायनलमध्ये एन्ट्री केली. वेस्ट इंडीज लीजेंड्स आणि श्रीलंका लीजेंड्स यांच्यात आज या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ इंडिया लीजेंड्सशी अंतिम सामना खेळेल.


पावसानं प्रभावित झालेल्या सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 च्या पहिला सेमीफायनल सामना 2 दिवस खेळवण्यात आला. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा दुसरा सेमीफायनल आज (30 सप्टेंबर) खेळवला जाईल. यापूर्वी हा सामना 29 तारखेला होणार होता. मात्र, पहिल्या सेमीफायनलमध्ये पावसानं व्यत्यय आणल्यानं वेस्ट इंडीज विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या सेमीफायनल सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.


श्रीलंका लीजेंड्सची जबरदस्त कामगिरी
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये श्रीलंकेच्या संघाची आतापर्यंतची कामगिरी चांगली आहे. श्रीलंकेनं ग्रुप स्टेजमध्ये टॉपवर आहेत, या स्पर्धेत त्यांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. श्रीलंकेनं 5 पैकी 4 सामने जिंकले तर एक सामना अनिर्णित राहिला. तिलकरत्ने दिलशान हा श्रीलंका लीजेंड्स संघाचं नेतृत्व करत आहे.


ब्रायन लाराच्या नेतृत्वात वेस्ट इंडीजची कामगिरी
ब्रायन लाराच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीजच्या संघानं ग्रुप स्टेजमधील 5 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. तर, उर्वरित 3 सामने अनिर्णित ठरले. त्यामुळं संघाला इतर संघाएवढेच गुण मिळाले.


श्रीलंकेचे खेळाडूंचा फॉर्म
श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशान हा त्याच्या संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यानं आतापर्यंत 4 डावात 174 धावा केल्या आहेत. दिलशानची सर्वोच्च धावसंख्या 107 धावा इतकी आहे. श्रीलंकेच्या संघात मुनावीराही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचे झालं तर, कुलसेकरा हा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्यानं 3 डावात 8 विकेट्स घेतले आहेत. त्याच्यापाठोपाठ फिरकी गोलंदाज सनथ जयसूर्याचा क्रमांक लागतो. ज्याच्या नावावर 3 डावात 5 विकेट्स घेण्याची नोंद आहे.


वेस्ट इंडीच्या संघाचं प्रदर्शन
वेस्ट इंडिजचा कर्णधार ड्वेन स्मिथ हा या हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसरा आणि वेस्ट इंडिजच्या दिग्गजांसाठी पहिला खेळाडू आहे. त्यानं 3 डावात 189 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 73 आहे. विंडीजची गोलंदाजी फारशी खास नाही. या बाबतीत श्रीलंकेच पारडं वेस्ट पेक्षा जडं दिसत आहे.


हे देखील वाचा-