India Legends vs Australia Legends: रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 च्या (Road Safety World Series 2022) पहिल्या सेमीफानलच्या रोमहर्षक सामन्यात इंडिया लीजेंड्सनं ऑस्ट्रेलिया लीजेंड्सचा (India Legends vs Australia Legends) पाच विकेट्सनं पराभव करत फायनलमध्ये धडक दिलीय. या सामन्यात भारताचा माजी क्रिकेटपटू आणि इंडिया लीजेंड्सचा कर्णधार सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) बॅटीतून सर्वोत्तम शॉट्स पाहायला मिळालं. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया लीजेंड्स संघानं संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केलीय. 


इरफान पठाण आणि नमन ओझा यांनी मिळून इंडिया लिजेंड्सला शानदार विजय मिळवून दिला. या सामन्यात 11 चेंडूत 10 धावा करून सचिन बाद झाला. मात्र, यादरम्यान वेगवान गोलंदाज ब्रेट लीच्या गोलंदाजीवर सचिन तेंडुलकरनं मारलेला बॅकफूट पंच फोर पाहण्यासारखा होता.


व्हिडिओ-






 


वेस्ट इंडीज- श्रीलंका यांच्यातील सामन्यावर सर्वांचं लक्ष
 वेस्ट इंडीज लीजेंड्स आणि श्रीलंका लीजेंड्स यांच्यात आज या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ इंडिया लीजेंड्सशी अंतिम सामना खेळेल. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये श्रीलंकेच्या संघाची आतापर्यंतची कामगिरी चांगली आहे. श्रीलंकेनं ग्रुप स्टेजमध्ये टॉपवर आहेत, या स्पर्धेत त्यांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. श्रीलंकेनं 5 पैकी 4 सामने जिंकले तर एक सामना अनिर्णित राहिला. तिलकरत्ने दिलशान हा श्रीलंका लीजेंड्स संघाचं नेतृत्व करत आहे. ब्रायन लाराच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीजच्या संघानं ग्रुप स्टेजमधील 5 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. तर, उर्वरित 3 सामने अनिर्णित ठरले. त्यामुळं संघाला इतर संघाएवढेच गुण मिळाले.


अंतिम सामना 1 ऑक्टोबरला
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा दुसरा सेमीफायनल सामना उद्या (30 सप्टेंबर) वेस्ट इंडीज लीजेंड्स आणि श्रीलंका लीजेंड्स यांच्यात  खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ 1 ऑक्टोबरला इंडिया लीजेंड्सच्या संघाशी भिडेल. हा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. 


हे देखील वाचा-