Australia A vs India A 2nd unofficial Test : आगामी बॉर्डर गावसकर ट्रॉफीपूर्वी भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरी अनधिकृत कसोटी गुरुवारपासून (7 नोव्हेंबर) खेळली जाणार आहे. मॅके येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारत 'अ' संघावर चेंडूशी छेडछाड केल्याचे आरोप लागला होता. ज्यामध्ये ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील भारत अ संघाविरुद्ध ऑस्ट्रेलियाला दारूण पराभवाला सामोरे जावे होते. अशा स्थितीत भारत अ संघ आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा करेल.


दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची मालिका संपताच राहुल आणि यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. हे दोन्ही खेळाडू एमसीजी येथील दुसऱ्या चार दिवसीय सामन्यात भारत अ संघाकडून खेळतील. कारण हे दोन्ही खेळाडूं आगामी बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा भाग आहे, त्यामुळे इशान किशनला भारत अ संघातून बाहेर बसावे लागेल. किशनचा भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता.


बॉर्डर गावसकर ट्रॉफीआधी भारत 'अ' संघ पर्थ येथे वरिष्ठ भारतीय संघाविरुद्ध तीन सामन्यांचा सराव खेळणार होता. पण तो सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला की, त्याऐवजी संघ WACA मधील सेंटर विकेटवर नेट सेशन आणि सेंटर-विकेट मॅच सिम्युलेशनचा सराव करेल.


भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ दुसऱ्या अनधिकृत कसोटी कुठे पाहणार?


भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ दुसरा अनधिकृत कसोटी सामना कुठे, कधी खेळवला जाईल?


ऑस्ट्रेलिया अ आणि भारत अ यांच्यातील दुसरा अनधिकृत कसोटी सामना मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. जो गुरुवार 7 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 5:00 वाजता सुरू होईल. हा चार दिवसीय सामना 10 नोव्हेंबरपर्यंत खेळवला जाणार आहे.


ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ दुसरा अनधिकृत कसोटी सामना कोठे पाहू शकता?


क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईट आणि ॲपद्वारे हा सामना भारतात लाईव्ह स्ट्रीम केला जाईल. सामना टीव्हीवर प्रसारित होणार नाही.


ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत अ संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, बाबा इंद्रजीत, इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), मुकेश कुमार, खलील अहमद, यश दयाल, नवदीप सैनी, मानव सुथार, तनुष कोटियन, केएल राहुल आणि ध्रुव जुरेल.


भारत अ मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया अ संघ : नॅथन मॅकस्विनी (कर्णधार), कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, स्कॉट बोलँड, जॉर्डन बकिंगहॅम, कूपर कॉनोली, ऑली डेव्हिस, मार्कस हॅरिस, सॅम कॉन्स्टस, नॅथन मॅकअँड्र्यू, मायकेल नेसर, टॉड मर्फी, फर्गस ओ'नील, जिमी पिअर्सन, जोश फिलिप, कोरी रॉकी मार्क स्टीकेटी, ब्यू वेबस्टर.