ICC T20 Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनं बुधवारी टी 20 क्रमवारी जारी केली आहे. यामध्ये मोठे फेरबदल झाल्याचं दिसत आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव यांना टी 20 क्रमवारीत फटका बसला आहे. सूर्यकुमार यादव आणि बाबर आझम यांना आशिया चषकात आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. याचाच फटका त्यांना क्रमवारीत बसला आहे. बाबर आझमचं अव्वल स्थान गेले आहे. तर सूर्यकुमार यादवची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. 


पाकिस्तानचा स्टार विस्फोटक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आयसीसीच्या टी 20 क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचलाय. त्यानं बाबर आझमच्या जागी स्थान पटकावलं आहे. आशिया चषकात मोहम्मद रिझवानने विस्फोटक फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. भारताविरोधात त्यानं विस्फोटक अर्धशतकी खेळी केली. याचा फायदा त्याला झालाय. ताज्या टी 20 क्रमवारीत पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान पहिल्या क्रमांकावर आहे. तर बाबर आझमची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्याशिवाय सूर्यकुमार यादवची एका स्थानाने घसरण झाली आहे. 



पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम एक हजार दिवसांपासून टी 20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. पण मागील दहा डावात बाबरला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. मागील 10 डावात बाबरला फक्त दोन अर्धशतकं झळकावता आलेली आहेत. तसेच आशिया चषकात त्यालाही मोठी खेळी करता आलेली नाही. याचा फटका त्याला बसलाय. त्यामुळे बाबरची टी 20 क्रमवारीत घसरण झाली आहे. 






 दुसरीकडे मोहम्मद रिझवानने आशइया चषकात विस्फोटक फलंदाजी केली आहे. रिझवानने तीन डावांत 192 धावांचा पाऊस पाडलाय. हाँगकाँगविरोधात नाबाद 78 धावांची खेळी केली होती. त्यानंतर भारताविरोधात 71 धावांचा पाऊस पाडला होता. याचाच फायदा रिझवानला झालाय. तो टी 20 मध्ये पहिल्या स्थानावर पोहचलाय. टी 20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचणारा रिझवान पाकिस्तानचा तिसरा खेळाडू आहे. यामधील  मिस्बाह उल हक आणि बाबर आझम यांनी पहिल्या स्थानावर झेप घेतली होती. बाबर आझम एक हजार 155 दिवस पहिल्या क्रमांकावर होता. 


भारताचा सूर्यकुमार यादवला आशिया चषकात आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. सूर्यकुमारला चार डावात एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. याचाच फटका सूर्यकुमार यादवला बसला आहे. सूर्यकुमार यादवचा चौथ्या स्थानावर घसरलाय.  दक्षिण अफ्रिकेचा मार्कराम तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंडचा डेविड मलान पाचव्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाचा क्रर्णधार रोहित शर्माला श्रीलंकेविरोधातील खेळीचा फायदा झालाय. रोहित शर्मा 14 व्या स्थानावर पोहचलाय.