ICC World Cup 2023 Live Streaming : चार वर्षांनतर पुन्हा एकदा वनडे विश्वछचषकाचा थरार होणार आहे. अहमदाबादच्या रणांगणात महाकुंभाला सुरुवात होत आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंड संघांमधल्या लढाईनं या महायुद्धाची ठिणगी पडणार आहे.  5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर यादरम्यान विश्वचषकासाठी दहा संघामध्ये लढत होणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडणार आहे. 


गतविजेत्या इंग्लंड आणि गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला सामना होणार आहे. यजमान भारत 8 ऑक्टोबरपासून आपल्या विश्वचषक अभियानाला सुरुवात करणार आहे. प्रत्येकालाच स्टेडिअमवर जाऊन सामना पाहण्याची संधी मिळत नाही. टिव्ही अथवा मोबाईलवर सामना हाण्याचा विचार करत असाल तर याबाबतची माहिती तुम्हाला सांगणार आहोत. विश्वचषकाच्या सर्व सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग अथवा टेलिकास्ट कुठे पाहाल अन् ऐकाल याबाबत जाणून घेणार आहोत. 


टिव्हीवर कुठे पाहाल वर्ल्डकपचे सर्व सामने


विश्वचषकातील सर्वा सामने स्टार स्पोर्ट्स चॅनलवर पाहायला मिळतील.  स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी, स्टार स्पोर्ट्स मराठी यासह इतर भाषांमध्ये सामन्याचे समालोचन होणार आहे.


मोबाइलवर कुठे पाहाल सामना ?


डिज्नी प्लस हॉटस्टार विश्वचषकाचे सर्व सामने मोफत पाहता येतील. मोबाइलवर सामना पाहण्यासाठी फक्त तुम्हाला हॉटस्टार अॅप डाउनलोड करावे लागेल. 


रेडियोवर कुठे ऐकाल लाईव्ह कॉमेंट्री ?


विश्वचषकातील सामन्याचे लाई्ह कॉमेंट्री अथवा समालोचन ऐकायचं असेल तर तुम्हाला ऑल इंडिया रेडियोच्या डिजिटल चॅनल - इंडिया: प्रसार भारतीवर जावे लागेल. त्याशिवाय आयसीसीच्या ऑफिशियल डिजिटल ऑडियो पार्टनर डिजिटल 2 स्पोर्ट्स (Digital 2 Sports) वरही समालोचन ऐकू शकता. 


विश्वचषकाच्या बातम्या कुठे वाचाल - 
विश्वचषकाच्या बातम्या अथवा स्कोअरकार्ड पाहण्यासाठी तुम्हाला आयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा एबीपी माझाच्या https://marathi.abplive.com/ संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.  


5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा शुभारंभ  - 


5 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. त्यानंतर आघाडीच्या चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने होणार आहेत. 19 नोव्हेंबर रोजी मेगा फायनल होणार आहे.