ICC Cricket World Cup 2023 : विश्वचषकात भारतीय संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे. सलग चार सामन्यात विजय मिळवत भारताने सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल केली आहे. नोव्हेंबरमध्ये भारतीय संघाचे शेड्युल व्यस्त आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटने भारतीय केळाडूंना काही दिवसांची सुट्टी देण्याचा विचार केला आहे. 22 ऑक्टोबर रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये धर्मशाला मैदानात सामना होणार आहे. त्यानंतर भारतीय संघाचा पुढील सामना 29 ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरोधात लखनौ येथे आहे. यादरम्यान सात दिवसांचा कालावधी आहे. या आठवडाभराच्या गॅपमध्येर भारतीय खेळाडूंना सुट्टी देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. भारतीय खेळाडूंना आपापल्या घरी जाण्याची संधी मिळणार आहे. 


टीम इंडियाला मिळणार आराम -


काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यामध्ये सात दिवसांचा कालावधी आहे. यादरम्यान टीम इंडियातील खेळाडूंना दोन ते तीन दिवसांचा ब्रेक दिला जाणार आहे. यादरम्यान खेळाडूंना घरी जाण्याची परवानगी मिळणार आहे. खासकरुन वेगवान गोलंदाजांचा वर्कलोड मॅनेजमेंट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आशिया चषकापासून भारतीय खेळाडू मैदानात आहेत. विश्वचषकातील पुढील सामन्यात भारतीय खेळाडू ताजेतवाने राहण्यासाठी टीम मॅनेजमेंटने दोन तीन दिवसांची सु्ट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. 26 ऑक्टोबर रोजी सर्व खेळाडू टीमसोबत एकत्र येणार आहेत, त्यानंतर ते लखनौला इंग्लंडविरोधात भिडण्यासाठी जमतील. 29 ऑक्टोबर रोजी लखनौच्या इकाना स्टेडिअमवर भारत आणि गतविजेता इंग्लंड यांच्यामध्ये आमना सामना होणार आहे. 


भारतीय संघ दमदार फॉर्मात


विश्वचषकात भारतीय संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे. भारतीय संघाने सलग चार सामन्यात विजय मिळत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर कब्जा मिळवला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचा पराभव करत चार गुणांची कमाई केली आहे. न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर विराजमान आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ या स्पर्धेत अजेय आहेत. इतर आठ संघांना पराभवाचा सामना करावा लागला. आता नंबर एक आणि नंबर दोन यांच्यामध्ये सामना होणार आहे. विजेता संघ गुणातालिकेत अव्वल स्थान पटकावेल. 


भारत आणि न्यूझीलंडचे महत्वाचा खेळाडू बाहेर - 


भारताचा हार्दिक पांड्या दुखापतीमुळे धर्मशालाच्या मैदानात खेळताना दिसणार नाही. त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा केन विल्यमसनही दुखापतग्रस्त झालेलाआहे. तोही या महत्वाच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही.  


आणखी वाचा :


हार्दिक पांड्याबाबत ब्रेकिंग! न्यूझीलंडविरुद्ध खेळणार की नाही? BCCI कडून हेल्थ अपडेट जारी