ICC Men's Cricket World Cup 2023 : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याने वनडे विश्वचषकाला दिमाखात सुरुवात झाली. यजमान भारताचा पहिला सामना चेन्नईमध्ये 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे. चेन्नईची खेळपट्टी फिरकीला मदत करणारी असल्यामुळे भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजांना घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता आहे. भारताच्या फिरकी गोलंदाजांचा सामना कऱण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाने खास प्लॅन आखला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बॅट कमिन्स याने याबाबत सांगितलेय.


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, प्रत्येक सामन्याआधी काही दिवस आम्ही तयारी करतो. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी फिरकी खेळण्याचा कसून सराव केला आहे. आमच्यातील फलंदाजांनी भारतात खूप क्रिकेट खेळले आहे. त्यांची कामगिरीही चांगली आहे. जवळपास सर्वच फलंदाजांना भारतीय गोलंदाजी माहित आहे, त्यांच्याकडे  खास प्लॅन तयार आहे.


वॉर्नर-मॅक्सवेल यांच्यावर विश्वास कायम - 
सलामी फलंदाज डेविड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या कामगिरीवर विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची कामगिरी अवलंबून आहे. या दोघांबद्दल बोलताना कमिन्स याने विश्वसा कायम असल्याचे सांगितले. भारताविरोधात डेविड वॉर्नर नेहमीच चांगली आणि विस्फोटक सुरुवात करतो. ग्लेन मॅक्सवेल चेंडू आणि बॅट दोन्हीने आपले योगदान देण्यास सक्षम आहे, असे कमिन्स म्हणाला.


भारतात आमचा रेकॉर्ड चांगलाच 
विश्वचषकाआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वनडे मालिका पार पडली. या मालिकेत भारताने 2-1 च्या फरकाने बाजी मारली. अखेरचा सामना ऑस्ट्रेलियाने एकहाती जिंकला होता. पॅट कमिन्स याने त्या सामन्याबद्दल चर्चा करताना म्हटले की, तिसऱ्या सामन्यात मोठा विजय मिळला, त्यामुळे आम्ही खूश आहोत. आमची प्लेईंग 11 चांगलीच उतरवण्यात येईल. भारतामध्ये आमचा रेकॉर्ड चांगला आहे, असे पॅट कमिन्स म्हणाला.


भारतापुढे प्लेईंग 11 चा पेच - 


चेन्नईची खेळपट्टी फिरकीला मदत करणारी आहे, अशात भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरणार का? यावरुनच रोहित शर्मापुढे पेच उभा राहिला आहे. आर. अश्विनला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळणं, कठीण आहे. पण चेन्नईची खेळपट्टी फिरकीला पोषक आहे. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या संघात एकापेक्षा जास्त डावखुरे फलंदाज आहेत. डावखुऱ्या फलंदाजाच्या विरोधात अश्विन भेदक ठरतो, त्यामुळे चेन्नईमध्ये आर. अश्विनला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळू शकते, असा तर्क लावला जातोय. पण अश्विनला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिल्यास शार्दूल ठाकूर अथवा मोहम्मद शामी यांना बाहेर बसावे लागू शकते. भारत तीन फिरकी गोलंदाजासह उतरणार का ? मोहम्मद शामी आणि शार्दुल ठाकूर यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार.. की दोन्ही खेळाडू प्लेईंग 11 च्या बाहेर बसतील, अशी चर्चा सुरु आहे.