ENG vs NZ WC 2023 : विश्वचषकाला अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium Ahmedabad) सुरुवात झाली. सव्वा लाखापेक्षा अधिक क्षमतेचं स्टेडियम पहिल्याच सामन्यात रिकामं पाहायला मिळतंय. क्रिकेटचा महाकुंभ, एकदिवसीय विश्वचषकाला आज दुपारी सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात गेल्या वर्ल्डकपचे फायनलिस्ट इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) अहमदाबादमध्ये भिडले. या सामन्यात आगळावेगळा विक्रम झाला आहे. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात विश्वविक्रम झालाय. 11 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या केली आहे. 

1975 मध्ये पहिला वनडे विश्वचषक पार पडला होता, तेव्हापासून आतापर्यंत सर्व 11 खेळाडूंना कधीही दुहेरी धावसंख्या पार करता आली नव्हती. यंदाच्या पहिल्याच सामन्यात हा पराक्रम झाला आहे. विश्वचषकाचे यंदाचा 13 वा हंगाम आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सलामीचा सामना होत आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 282 धावांपर्यंत मजल मारली. इग्लंडकडून जो रुट याने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली. तर न्यूझीलंडकडून मॅट हेनरी याने तीन फलंदाजांना तंबूत पाठवले.

इंग्लंडच्या फलंदाजांची कामगिरी

फलंदाज BATSMAN धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राइक रेट

जॉनी बेअरस्टो Jonny Bairstow  

33 35 4 1 94.28

डेविड मलान Dawid Malan 

14 24 2 0 58.33

जो रुट Joe Root 

77 86 4 1 89.53

हॅरी ब्रूक Harry Brook 

25 16 4 1 156.25

मोईन अली Moeen Ali 

11 17 1 0 64.70

जोस बटलर Jos Buttler 

43 42 2 2 102.38

लियाम लिव्हिंगस्टोन Liam Livingstone 

20 22 3 0 90.90

सॅम करन Sam Curran 

14 19 0 0 73.68

ख्रिस वोक्स Chris Woakes 

11 12 1 0 91.66

अदील रशीद Adil Rashid 

15 13 0 1 115.38

मार्क वूड Mark Wood 

13 14 0 0 92.85
EXTRAS : 6
(b - 0, w - 6, no - 0, lb - 0, penalty - 0)

इंग्लंडची फंलदाजी ढेपाळली - 

इंग्लंडकडून जो रुट याने चिवट फलंदाजी केली. एका बाजूला विकेट पडत असताना जो रुट याने दुसऱ्या बाजूला एकेरी दुहेरी धावसंख्यावर भर दिला. जो रुट याने 77 धावांची दमदार खेळी केली. जो रुट याने 86 चेंडूत एक षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 77 धावांचे योगदान दिले. कर्णधार जोस बटलर आणि सलामी फलंदाज जॉनी बेअरस्टो यांना चांगली सुरुवात मिळाली, पण मोठी धावसंख्या उभारता आली नाही. जॉनी बेअरस्टो याने 35 चेंडूत 33 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये बेअरस्टो याने एक षटकार आणि चार चौकार ठोकले. तर कर्णधार जोस बटलर याने 42 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले. यामध्ये दोन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. 

जो रुट, जॉनी बेअरस्टो आणि जोस बटलर यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्याही ओलांडता आली नाही. डेविड मलान 14, हॅरी ब्रूक 25, मोईन अली 11 आणि लियाम लिव्हिंगस्टोन 20 धावांवर तंबूत परतले. सॅम करन आणि ख्रिस वोक्स या अष्टपैलू खेळाडूंनाही मोठी खेळी करता आली नाही. सॅम करन याने 14 तर ख्रिस वोक्स याने 11 धावांचे योगदान दिले.