एक्स्प्लोर

IPL मध्ये मोठा ट्विस्ट, ज्या आरसीबीला आयुष्यभर ट्रोल केलं, त्यांच्याच विजयासाठी सीएसकेचे चाहते देव पाण्यात बुडवून बसले, चक्रावून टाकणारं समीकरण

CSK IPL 2026 playoff scenario : धर्मशालामध्ये होणाऱ्या पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याकडे संपूर्ण चेन्नईच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

PBKS vs RCB Match CSK IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्स आज मैदानात उतरणार नसली, तरी धर्मशालामध्ये होणाऱ्या पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याकडे संपूर्ण चेन्नईच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. कारण या सामन्याचा निकाल थेट सीएसकेच्या आयपीएल 2026 प्लेऑफच्या आशांवर परिणाम करणार आहे. परिस्थिती अशी झाली आहे की, चेन्नईचे चाहते आता नाईलाजाने आरसीबीच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत.

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध सात विकेट्सनी झालेल्या पराभवानंतर सीएसकेचे मोठे नुकसान झाले. संघ आता गुणतालिकेत 12 गुण आणि +0.027 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर घसरला आहे. त्यामुळे उरलेल्या दोन सामन्यांमध्ये चूक करण्याची अजिबात संधी राहिलेली नाही. एक पराभव म्हणजे थेट स्पर्धेबाहेर जाण्याचा धोका.

चेन्नईसमोर आता सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सविरुद्धचे दोनच सामने उरले आहेत. त्यामुळे सीएसकेची प्लेऑफची आशा आता स्वतःच्या कामगिरीसोबत इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून झाली आहे. विशेषतः आजच्या पीबीकेएस विरुद्ध आरसीबी सामन्यावर.

सीएसकेला का हवा RCBचा विजय?

आज जर आरसीबीने पंजाबचा पराभव केला, तर चेन्नईसाठी प्लेऑफचं समीकरण खूप सोपं होईल. कारण त्या परिस्थितीत पंजाब 13 गुणांवरच राहील आणि त्यांच्याकडे फक्त एकच सामना उरेल. म्हणजे पीबीकेएस जास्तीत जास्त 15 गुणांपर्यंतच पोहोचू शकतो.

अशावेळी सीएसकेने उरलेले दोन्ही सामने जिंकले, तर त्यांचे 16 गुण होतील आणि नेट रनरेटच्या गुंतागुंतीत न अडकता ते पंजाबला मागे टाकून थेट टॉप-4 मध्ये पोहोचू शकतात. त्यामुळे आज आरसीबीचा विजय म्हणजे चेन्नईसाठी मोठा दिलासा ठरू शकतो.

पंजाब जिंकला तर वाढणार टेन्शन

पण जर पंजाबने आरसीबीला हरवलं, तर चेन्नईसमोरचं संकट आणखी गडद होईल. पीबीकेएसचे 15 गुण होतील आणि त्यांची प्लेऑफमधील पकड मजबूत बनेल. अशा वेळी सीएसकेने दोन्ही सामने जिंकून 16 गुण मिळवले तरी त्यांचं भविष्य नेट रनरेटवर अडकू शकतं. त्यात पंजाबसोबत हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील स्पर्धाही निर्णायक ठरू शकते. सर्वात मोठी अडचण म्हणजे, पंजाब जिंकला आणि सीएसकेने उरलेल्या दोन सामन्यांपैकी एक जरी गमावला, तर त्यांचे फक्त 14 गुण होतील आणि प्लेऑफचं स्वप्न जवळपास संपुष्टात येईल.

सीएसकेसाठी सर्वात महत्त्वाचं काय?

आजच्या पीबीकेएस विरुद्ध आरसीबी सामन्याचा निकाल महत्त्वाचा असला, तरी चेन्नईसाठी खरं समीकरण अगदी स्पष्ट आहे, उरलेले दोन्ही सामने जिंकणं अनिवार्य आहे. एलएसजीविरुद्धच्या मोठ्या पराभवामुळे त्यांचा नेट रनरेट आधीच खराब झाला आहे. त्यामुळे 14 गुणांवर स्पर्धा संपवली, तर इतर अनेक निकालांवर अवलंबून राहावं लागेल आणि त्या शक्यता खूपच कमी आहेत. म्हणूनच आता सीएसकेसाठी प्रत्येक सामना हा “करो या मरो” बनला आहे, तर आज धर्मशालामध्ये आरसीबीच्या विजयासाठी चेन्नईचे चाहते मनोमन प्रार्थना करताना दिसणार आहेत.

हे ही वाचा -

PBKS vs RCB LIVE Score : सलग पराभवांनी पंजाब हादरलं… आता अस्तित्वाची लढाई; आज RCBचा विजय म्हणजे PBKSचा गेम ओव्हर?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
Auqib Nabi Profile : वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी
वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
Embed widget