T20 World Cup 2022: टी-20 क्रिकेटमध्ये प्रत्येक षटक महत्वाचं असतं. परंतु, डेथ ओव्हर्समधील भूमिका सर्वात निर्णायक ठरते. जो संघ डेथ ओव्हर्समध्ये चांगली फलंदाजी किंवा गोलंदाजी करते, तोच संघ सामन्यावरही नाव कोरतो. डेथ ओव्हर्समध्ये जबरदस्त कामगिरी करणार खेळाडू ज्यांच्या संघात आहे, त्यापेक्षा चांगलं काही असू शकत नाही. दरम्यान, यंदाच्या टी-20 विश्वचषकातील डेथ ओव्हर्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गोलंदाजावर नजर टाकुयात. विशेष म्हणजे, यादीत दोन भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे. 


यंदाच्या टी-20 विश्वचषकातील डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेटनं फलंदाजी करणाऱ्या फलंदाजीच्या यादीत दासुन शनाका अव्वल स्थानी आहे. या यादीत जेम्म नीशम दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर हार्दिक पांड्या तिसऱ्या आणि रोव्हमने पॉवेल चौथ्या स्थानावर आहे. तर, दिनेश कार्तिक पाचव्या स्थानावर आहे. 


1) दासुन शनाका:
यंदाच्या टी-20 विश्वचषकात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकानं डेथ ओव्हर्समध्ये 210.61 स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत. या स्पर्धेत शनाकानं डेथ ओव्हर्समध्ये 11 डावात 113 चेंडू खेळून 238 धावा केल्या आहेत. 


2) जेम्स नीशम:
न्यूझीलंडचा ऑलराऊंडर नीशम हा यंदाच्या टी-20 विश्वचषकातील डेथ ओव्हर्समध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त स्ट्राइक रेट असलेला फलंदाज आहे. नीशमनं 12 डावांमध्ये 96 चेंडूंचा सामना केला आणि 196 धावा केल्या आहे. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 204.16 इतका होता.


3) हार्दिक पांड्या: 
टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचाही या यादीत समावेश आहे. पांड्यानं यावर्षी डेथ ओव्हर्समध्ये 112 चेंडूत 216 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 192.85 इतका आहे.


4) रोव्हमेन पॉवेल:
वेस्टइंडीज के विस्फोटक फलंदाज रोवमेन पॉवेलनं यंदाच्या टी-20 विश्वचषकातील डेथ ओव्हर्समध्ये 12 डावात 95 चेंडूत 181 धावा केल्या.यादरम्यान पॉवेलचा स्ट्राइक रेट 190.52 इतका होता.


5) दिनेश कार्तिक:
टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक देखील येथे टॉप-5 मध्ये आहे. त्यानं यावर्षी डेथ ओव्हर्समध्ये 16 डावांत 96 चेंडूत 163 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 169.79 इतका होता.


हे देखील वाचा-