T20 World Cup 2022 Match Live Streaming : टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धा सुरु झाली असून सध्या सुपर 12 फेरीतील सामने सुरु आहेत. दरम्यान यजमान संघ ऑस्ट्रेलियाने (Team Australia) यंदा खास कामगिरी केली नसल्याचं दिसून येत आहे. सलामीच्या सामन्यातच न्यूझीलंड संघाने त्यांना 89 धावांनी तगडी मात दिली. ज्यानंतर आज त्यांच्यासमोर श्रीलंका संघाचं आव्हान असणार आहे. दरम्यान त्यांना या सामन्यात विजय मिळवणं महत्त्वाचं आहे. कारण ऑस्ट्रेलियाने आता सामने गमावले तर ते उपांत्य फेरीच्या शर्यतीत खूप मागे पडू शकतात. यामुळेच आजचा सामना ऑस्ट्रेलियन संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आज पार पडणाऱ्या या सामन्यांबद्दलची माहिती जाणून घेऊ...


दरम्यान या सामन्यापूर्वी संघाचा मुख्य फिरकीपटू अॅडम झाम्पा कोविड-19 पॉझिटिव्ह (Adam Zampa Corona Positive) आढळला आहे. ज्यामुळे आधीच खराब फॉर्मात असणाऱ्या टीम ऑस्ट्रेलियाची हालत आणखी खराब झाली आहे. दरम्यान विश्वचषक सुरु होण्यापूर्वीच आयसीसीने (ICC New Regulations) नवीन नियमावली आणत स्पर्धेमध्ये, कोविड -19 संक्रमित खेळाडूंना (Corona Positive Players) देखील वैद्यकीय टीमच्या परवानगीनंतर खेळता येईल अशी घोषणा केली होती. रविवारी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात कोविड पॉझिटिव्ह असूनही आयर्लंडचा जॉर्ज डॉकरेल प्लेइंग-11 मध्ये सामील होता. त्यामुळे आज झाम्पाही ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग-11 मध्ये सहभागी होऊ शकतो. पण त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे? तसंच वैद्यकीय टीम काय सूचना देईल? यावर झाम्पाचं आजच्या सामन्यात खेळणं अवंलंबून असणार आहे.


कधी होणार सामना?


ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका हा टी20 विश्वचषक सुपर 12 फेरीतील सामना आज अर्थात 25 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 4.30 वाजता सामना सुरु होईल. सामना सुरु होण्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होणार आहे.


कुठे होणार सामना?


आजचा हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघातील सामना ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथील पर्थ क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  


कुठे पाहता येणार सामना?


या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   


हे देखील वाचा-