Bhupinder Singh Hooda on Vinesh Phogat : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट सतत चर्चेत आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशने तीन सामने जिंकले आणि अंतिम फेरीत धडक मारली. पण अंतिम सामन्याआधी तिचे 100 ग्रॅम वजन वाढलेल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाटचे भारतात परतल्यावर जंगी स्वागत करण्यात आले.
शुक्रवारी विनेशने काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर विनेश काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांची प्रतिक्रिया आली आहे.
भूपेंद्र सिंह हुड्डा यांना जेव्हा विचारण्यात आले की, विनेश फोगाट काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत का? तर ते म्हणाले, "हा एक काल्पनिक प्रश्न आहे. खेळाडू हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो, तो संपूर्ण देशाचा असतो. ती आली तर आम्ही स्वागत करतो. पण तिच्या इच्छेवर अवलंबून नाही, ती आपल्या देशाची खेळाडू आहे, तिला पूर्ण सन्मान मिळावा. विनेश फोगाटला राज्यसभेसाठी उमेदवारी द्यावी.
काँग्रेस नेते हुड्डा यांनी पुन्हा एकदा विनेश फोगाटला सुवर्णपदक विजेत्याचा मान देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, "जो सन्मान सुवर्णपदक विजेत्याला दिला जातो, तोच सन्मान तिला दिला जावा, असे मी आधी सांगितले होते. तिला तो सन्मान दिला गेला नाही."
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा पुढे म्हणाले, "...जसे सचिन तेंडुलकरला राज्यसभेवर नामनिर्देशित केले होते, त्याचप्रमाणे विनेश फोगाटलाही राज्यसभेवर नामनिर्देशित केले पाहिजे. कारण तिच्यावर अत्याचार झाले आणि तिला न्याय मिळाला नाही."
विनेश फोगाट शुक्रवारी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी तसेच भूपेंद्र सिंह हुड्डा आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी दिल्लीतील निवासस्थानी पोहोचल्या होत्या.
हे ही वाचा :
PAK vs BAN Test : १५ रुपयांतही तिकीट कुणी घेईना, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला घ्यावा लागला निर्णय