India vs New Zealand 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे खेळवला जा आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळालेल्या न्यूझीलंड संघाची अवस्था अतिशय वाईट झाली. त्यानी लवकर सुरुवातीच्या विकेट गमावल्या. अवघ्या 10.3 षटकांत अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. ज्यानंतर 108 धावांवर त्यांचा डाव आटोपला. दरम्यान यावेळी त्यांनी कॉन्वेच्या रूपाने चौथी विकेट गमावली. भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) त्याला स्वत:च गोलंदाजी करताना झेलबादही केले.


हार्दिकच्या या शानदार कॅचचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हार्दिकने त्याच्या पहिल्या षटकातील चौथा चेंडू कॉन्वेकडे टाकला. या चेंडूवर कॉन्वेला ड्राइव्ह शॉट खेळायचा होता, पण चेंडू थेट हार्दिक पांड्याच्या हातात गेला आणि त्याने हा झेल घेऊन कॉन्वेला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हार्दिक त्याच्या बॉलिंग अॅक्शनने पूर्णपणे सरळ होऊ शकला नाही आणि तितक्यात चेंडू त्याच्या दिशेने येतो. हा झेल तो फक्त डाव्या हाताने पकडतो. हा झेल जमिनीच्या अगदी वर होता. झेल घेण्यासाठी त्याला खूप खाली जावे लागते. यानंतर तो जमिनीवर पडतो आणि नंतर ही विकेटचं सेलिब्रेशन करतो.


पाहा VIDEO -






108 धावांत न्यूझीलंड सर्वबाद


सामन्यात सर्वप्रथम भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅप्टनचा हा निर्णय गोलंदाजांनी अगदी पहिल्या ओव्हरपासून योग्य असल्याचं दाखवलं. शमीने पहिलंच षटक निर्धाव टाकत एक विकेटही घेतली. ज्यानंतर सर्वच गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली. विशेष म्हणजे भारताकडून आज गोलंदाजी केलेल्या सहाही गोलंदाजांच्या खात्यात किमान एकतरी विकेट आली. यावेळी सर्वाधिक विकेट्स शमीने तीन घेतल्या. तर पांड्या आणि सुंदर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.तर सिराज, कुलदीप आणि शार्दूल यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. न्यूझीलंडच्या फलंदाजीचा विचार करता सर्वाधिक धावा ग्लेन फिलिप्सने (36) केल्या. तर ब्रेसवेल (22) आणि सँटनर (27) यांनीही थोड्याप्रमाणात डाव सावरल्यामुळे न्यूझीलंडता संघ 100 धावांचा आकडा गाठू शकला.


हे देखील वाचा-