नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ (Team  India) येत्या काही दिवसांमध्ये श्रीलंकेच्या (IND vs SL) दौऱ्यावर जाणार आहे. 27 जुलैपासून तीन सामन्यांची टी 20 मालिका देखील सुरु आहे. रोहित शर्मानं (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बीसीसीआय, निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि कोच गौतम गंभीर यांच्यासमोर कॅप्टन कुणाला करायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे.  सुरुवातीला भारताच्या टी 20 टीमचा कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) नाव आघाडीवर होतं. मात्र, गौतम गंभीरची सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नावाला पसंती असल्याच्या चर्चा आहेत. यामुळं निवड समिती नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. 


सुरुवातीला हार्दिक पांड्याच्या नावाची चर्चा 


रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकला. या मालिकेत भारताचा उपकॅप्टन म्हणून हार्दिक पांड्यावर जबाबदारी देण्यात आली होती. हार्दिक पांड्या यामुळं कॅप्टन पदाच्या शर्यतीत आघाडीवर होता. मात्र, प्रशिक्षक गौतम गंभीरची सूर्यकुमार यादवला पसंती असल्याच्या चर्चा सुरु आहेत. भारतानं हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात देखील काही सामने खेळले आहेत. हार्दिक पांड्यानं श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार घेतलेली आहे.


सूर्यकुमार यादवचं नाव देखील चर्चेत 


भारतामध्ये 2026 ला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी दूरगामी विचार करुन सूर्यकुमार यादवच्या नावाला गौतम गंभीरची पसंती असल्याची माहिती आहे. सूर्यकुमार यादवला नोव्हेंबर 2023 मध्ये भारताच्या टी 20 संघाचं नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली होती. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी 20 मालिका जिंकली होती. दक्षिण आफ्रिके विरुद्धची मालिका देखील भारतानं सूर्याच्या नेतृत्त्वात बरोबरीत सोडवली होती. सूर्यकुमार यादवनं आतापर्यंत  7 टी 20 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्त्व केलं होतं. त्यामध्ये पाच सामने  भारतानं जिंकले तर दोन  सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागल होता.  


हार्दिक पांड्यानं देखील भारताच्या टी 20 संघाचं यापूर्वी नेतृत्त्व केलेलं आहे. हार्दिक पांड्या नेतृत्त्वात भारतानं 16 टी 20 मॅचेस खेळल्या असून त्यापैकी 10 सामने भारतानं जिंकले तर 5 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. 


आता निवड समिती आणि प्रशिक्षक यांच्यातील बैठक लांबणीवर पडली आहे. रोहित शर्मानं भारताचं टी 20 क्रिकेटमधील नेतृत्त्व विश्वविजेतेपद मिळवून सोडलं होतं. नव्यानं जो व्यक्ती भारतीय संघाचं नेतृत्त्व करेल त्याच्यावर 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपला डोळ्यासमोर ठेवून संघाची बांधणी करावी लागणार आहे. 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपचा विचार केला असता सूर्यकुमार यादवचं नाव आघाडीवर आहे.  


संबंधित बातम्या :


ICC T20 Rankings: हार्दिक पांड्याला आयसीसी रँकिंगमध्ये मोठा फटका, यशस्वी जयस्वालला लॉटरी, सूर्या कितव्या स्थानी?


Rohit Sharma : रोहित शर्मा श्रीलंका दौऱ्यात खेळण्याची शक्यता, विराट कोहली अन् जसप्रीत बुमराहचं काय?