एक्स्प्लोर

Harbhajan Singh on Sreesanth : वाद पुन्हा चव्हाट्यावर... श्रीसंतच्या बॉक्सिंग चॅलेंजवर हरभजनची अशी प्रतिक्रिया, जी ऐकून सगळेच चक्रावले, नेमकं काय म्हणाला भज्जी?

Harbhajan Singh Replied Sreesanth : आयपीएलच्या इतिहासातील पहिल्या हंगामातील सर्वात वादग्रस्त आणि कुप्रसिद्ध स्लॅपगेट प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Harbhajan Singh Replied Sreesanth on Instagram : आयपीएलच्या इतिहासातील पहिल्या हंगामातील सर्वात वादग्रस्त आणि कुप्रसिद्ध स्लॅपगेट प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नुकतेच श्रीसंतने भज्जीला (हरभजन सिंग) बॉक्सिंग रिंगमध्ये येऊन दोन हात करण्याचे खुले आव्हान दिले होते. श्रीसंतच्या या विधानानंतर आता हरभजन सिंगने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत त्याला सडेतोड उत्तर दिले आहे, ज्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

श्रीसंतचे हरभजन सिंगला खुले आव्हान

द लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीत श्रीसंतने 2008 मधील प्रसिद्ध थप्पडकांडवर भाष्य केले. तो म्हणाला, "भज्जी पा, तुमच्यात जर दम असेल तर माझ्यासोबत बॉक्सिंग रिंगमध्ये या. हे तुम्हाला माझे ओपन चॅलेंज आहे, तेही कागदावर सही करून. जर तुम्हाला थप्पडकांडाचा इतकाच त्रास होत असेल, तर या रिंगमध्ये. तुमच्यात थोडा जरी स्वाभिमान असेल तर मी तुमची वाट पाहत आहे."

हरभजन सिंगचे इन्स्टाग्रामवरून उत्तर

श्रीसंतच्या या आव्हानानंतर हरभजन सिंगने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने थेट श्रीसंतचे नाव घेतले नसले, तरी युजर्सच्या मते हे उत्तर श्रीसंतसाठीच आहे. व्हिडिओमध्ये हरभजन सिंग म्हणतो की, "कोणीतरी खूप छान म्हटलं आहे की, जे लोक बकवास बोलतात त्यांना बोलू द्या... कारण नेहमी रिकामी भांडीच जास्त आवाज करतात." विशेष म्हणजे या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला यांचे प्रसिद्ध गाणे 295 वाजताना ऐकू येत आहे, ज्यामुळे भज्जीने श्रीसंतला चांगलाच टोला लगावल्याची चर्चा आहे.

थप्पडकांडनंतर आता जाहिरात कांडमुळे वाद पेटला

2008 च्या आयपीएल (IPL) दरम्यान हरभजनने श्रीसंतला मैदानात कानाखाली मारली होती. अनेक वर्षे त्यांच्यात अबोला होता, पण नंतर परिस्थिती सुधारली होती. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला एका जाहिरातीमुळे (Advertisement) हा वाद पुन्हा सुरू झाला. जाहिरात काय होती? हरभजन सिंगने एका इलेक्ट्रॉनिक ब्रँडची जाहिरात केली होती, ज्यामध्ये तो शिक्षकाच्या भूमिकेत होता. तो जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मारून सुरू करण्याच्या सवयीवर विनोद करत म्हणतो, "नीट थप्पड मारा, सगळं ठीक होतं."

श्रीसंतने खुलासा केला होता की, हरभजनने ही जाहिरात त्याला सोशल मीडियावर शेअर करायला सांगितली होती. मात्र, श्रीसंतने याला साफ नकार दिला. जुन्या जखमांवरून जाहिरात केल्यामुळे श्रीसंत हरभजनवर प्रचंड संतापला असून, यामुळेच त्यांच्यातील संबंध पुन्हा एकदा पूर्णपणे बिघडले आहेत.

हे ही वाचा -

IND vs AFG 3rd Live Score Update : अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली, दोन्ही टीममध्ये तब्बल 7 मोठे बदल, जाणून घ्या प्लेइंग-11

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SL Test Series Schedule : टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
India vs Pakistan : ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
Netherlands Captain News : वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Embed widget