Harbhajan Singh Retirement: भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहनं क्रिकेटला आज (शुक्रवारी, 24 डिसेंबर) अलविदा केलाय. त्यानं 23 वर्षाच्या कारकिर्दीनंतर निवृत्तीची घोषणा केलीय. त्यानं ट्विटरवर भावनिक पोस्ट करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलंय. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणारा हरभजन सिंग बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर होता. यातच त्यानं निवृत्तीचा निर्णय घेऊन चाहत्यांना मोठा धक्का दिलाय. हरभजन सिंहला भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक खेळाडू म्हणून ओळखलं जायचं. हजभजननं 2015 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी आणि एकदिवसीय सामना खेळला होता. तर, भारताकडून त्यानं अखेरचा टी-20 सामना 2016 मध्ये खेळला होता.
हरभजन सिंहनं 1998 मध्ये पदार्पण केलं होतं आणि तो अखेरचा 2016 मध्ये निळ्या जर्सीत दिसला होता. त्यानं भारतीय संघासाठी 103 कसोटी सामने, 236 एकदिवसीय सामने आणि 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 417 विकेट्स घेतल्या आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 269 विकेट्सची नोंद आहे. तर, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यानं 25 विकेट्स घेतल्या आहेत.
हरभजनचं ट्वीट-
हरभजन सिंहनं 2008 पासून आयपीएलमध्ये खेळण्यास सुरुवात केली. त्यानं आयपीएलमध्ये एकूण 163 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्यानं एकूण 150 विकेट्स घेतले आहेत. आयपीएलच्या तेराव्या हंगामात त्यानं खेळण्यास नकार दिलाय. त्यानंतर आयपीएलच्या चौदाव्या हंगामात कोलकाताच्या संघानं त्याला खेरदी केलं. परंतु, त्याला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. या हंगामात त्याला केवळ तीन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या तीन सामन्यात त्याला एकही विकेट्स घेता आली नाही.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- गांगुली-विराट वादात आता दिलीप वेंगसरकरांची उडी, गांगुली यांच्यावर टीका
- IND vs SA Test Series : कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिका टेस्ट सीरीजमध्ये करु शकतो खास रेकॉर्ड, कोच राहुल द्रविडला मागे टाकण्यासाठी सज्ज
- 1983 Players Match Fee: 1983 चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना किती मानधन मिळायचं? एकदा बघाच