एक्स्प्लोर

Happy Birthday : एका डावात 10 विकेट्स, सर्वाधिक 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम; अनिल कुंबळेंच्या विक्रमांवर नजर

Happy Birthday Anil Kumble : अनिल कुंबळेला जम्बो या नावाने ओळखलं जातं. अनिल कुंबळेने आपल्या फिरकीच्या तालावर अनेक दिग्गजांना नाचवलं आहे.

Anil Kumble Happy Birthday : भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) याचा आज 53 वा वाढदिवस आहे. अनिल कुंबळेला जम्बो या नावाने ओळखलं जातं. अनिल कुंबळेने आपल्या फिरकीच्या तालावर अनेक दिग्गजांना नाचवलं आहे. 17 ऑक्टोबर 1970 रोजी जन्माला आलेल्या कुंबळेच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास एक हजार विकेट आहेत.भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळेचं नाव घेतलं जातं. कुंबळेंनी कसोटी क्रिकेटच्या एका डावात 10 फलंदाजांना तंबूत पाठवण्याचा पराक्रम केलाय. त्याशिवाय भारताकडून सर्वाधिक वेळा पाच विकेट्स विक्रमही त्यांच्याच नावावर आहेत. अनिल कुंबळेला क्रिकेट विश्वातून वाढदिवसाच्या शुभेच्चा दिल्या जात आहेत. चाहत्यांकडून त्याच्या विक्रमाची यादी सोशल मीडियावर टाकली जात आहे. कुंबळेच्या नावावर असलेल्या काही रंजक विक्रम पाहूयात... 

कसोटी सामन्याच्या एका डावात 10 विकेट्स

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्या अनिल कुंबळेंनी एकाच डावात 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. अशी कामगिरी करणारा अनिल कुंबळे पहिला भारतीय आणि जगातील दुसरा गोलंदाज आहे. त्याच्यापू्र्वी इंग्लिश गोलंदाज जिम लेकरनं सर्वात प्रथम कसोटीच्या सामन्याच्या एका डावात 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलनं भारताविरुद्ध 10 विकेट्स घेऊन खास क्लबमध्ये एन्ट्री केली होती. आतापर्यंत या तिघांनाच कसोटी सामन्याच्या एका डावात 10 विकेट्स घेता आल्या आहेत. 

कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय
अनिल कुंबळेंनी भारतासाठी कसोटी क्रिकेटच्या 132 सामन्यात सर्वाधिक 619 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत कुंबळे चौथ्या क्रमांकावर आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्येही कुंबळे याने 271 सामन्यात 337 विकेट्स मिळवल्या आहेत. यादरम्यान त्यानी दोन वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. 

कसोटीत सर्वाधिक चेंडू टाकणारा गोलंदाज
भारतासाठी कसोटीत सर्वाधिक चेंडू टाकण्याचा विक्रमही कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळेनी कसोटीत 40 हजार 850 चेंडू टाकले आहेत. केवळ मुथय्या मुरलीधरननं (44,039) कसोटी क्रिकेटमध्ये कुंबळेपेक्षा जास्त चेंडू टाकले आहेत. भारतासाठी कसोटीत सर्वाधिक पाच विकेट्स घेणाऱ्यांमध्येही कुंबळेंचं नाव आहे. कुंबळेंनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 35 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.

इतर विक्रम
- कसोटी क्रिकेटमध्ये 2 हजार 506 धावा
- इंग्लंडविरुद्ध एकमेव शतक
- कसोटीत 2 हजार धावांसह 500 हून अधिक धावा करणारे जगातील दुसरे गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कारकिर्द
अनिल कुंबळेनी 123 कसोटी आणि 271 एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. कसोटीत कुंबळेच्या नावावर 619 विकेट्स घेतल्या आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये कुबंळेच्या नावावर 337 विकेट्सची नोंद आहे. याशिवाय कुंबळेंनी 42 आयपीएल सामनेही खेळले आहेत.  ज्यात त्यांनी 45 विकेट्स घेतल्या आहेत. अनिल कुंबळे याने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्वही यशस्वीपणे संभाळले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratap Sarnaik on Acharya Marathe College :चेंबुर कॉलेजच्या जीन्स , टी शर्ट बंदीचा मुद्दा विधानसभेतBuldhana : खेरडा येथील तलाठी कार्यालय बंद; तलाठ्याची महिलांसोबत अरेरावीVidhanparishad Maratha Reservation : विधानपरिषदेत मराठा आरक्षणावर चर्चाAjit Pawar on Nawab Malik : नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतोय का ? अजित पवारांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
Embed widget