भले भले गेले पण मॅक्सवेल एकटाच नडला, दुखापत असतानाही बिग शोचं गेम चेंजिंग शतक
Glenn Maxwell, World Cup 2023 : वानखेडेच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना रोमांचक स्थितीत पोहचलाय.
Glenn Maxwell, World Cup 2023 : वानखेडेच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना रोमांचक स्थितीत पोहचलाय. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज अफगाण अक्रमणासमोर नांगी टाकली, पण ग्लेन मॅक्सवेल याने एकट्याने लढा दिला. दुखापत झाली असतानाही ग्लेन मॅक्सवेल याने मैदान सोडले नाही. मॅक्सवेलला धावताही येत नव्हते. पण त्याने जिद्द सोडली नाही. त्याने लढा दिला. विवाहळत मॅक्सवेल याने अफगाण आक्रमणाचा सामना केला. ऑस्ट्रेलिया अडचणीत असताना मॅक्सवेलने शतक ठोकले. ग्लेन मॅक्सवेल 33 धावांवर असताान अफगाणिस्तानने झेल सोडला होता. त्यानंतर मॅक्सवेलने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला सामन्यात परत आणले.
91 धावांत ऑस्ट्रेलियाचे सात आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते. त्यामध्ये डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, मिचेल मार्श यांच्यासह इतर फलंदाजांचा समावेश होता. आता अफगाणिस्तान संघ एकतर्फी सामना जिंकणार असेच वाटले होते. पण ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी झुंजार खेळी केली. मॅक्सवेलला धावताही येत नव्हते. पण त्याने जिद्द सोडली नाही. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. मॅक्सवेल अडचणीच्या काळात ऑस्ट्रेलियासाठी हिरो ठरला आणि आपले शतक पूर्ण केले.
ऑस्ट्रेलियने 91 धावांत सात फलंदाज गमावले होते. आघाडीच्या सात पलंदाजांना झटपट बाद केल्यानंतर सामन्यावर अफगाणिस्तानचे वर्चस्व होते. पण मॅक्सवेलने एकट्याने लढा दिला. त्याला धावता येत नव्हते, पण त्याने एकट्यानेच किल्ला लढवला. मॅक्सवेलच्या एकट्याच्या जिवावार ऑस्ट्रेलिया विजयाच्या स्थितीत पोहचलाय. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 50 चेंडूत 50 धावा करायच्या आहेत.
मॅक्सवेलचे वादळी शतक -
ग्लेन मॅक्सवेल याने 105 चेंडूत 151 धावा केल्या आहेत. तो अद्याप खेळपट्टीवर आहे. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतोय. मॅक्सवेल याने आपल्या खेळीत 5 षटकार आणि 18 चौकार ठोकले. मॅक्सवेलने कर्णधार पॅट कमिन्सच्या साथीने 141 चेंडूत 154 धावांची भागिदारी केली. यामध्ये मॅक्सवेलचे योगदान 133 धावांचे आहे.
150 BY GLENN MAXWELL...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 7, 2023
THE GREATEST EVER KNOCK BY A MIDDLE ORDER BATTER IN WORLD CUP. pic.twitter.com/LfSKr6lU2g
This is a warrior innings by Glenn Maxwell. pic.twitter.com/gq9cQavphM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 7, 2023
HISTORY IN MUMBAI...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 7, 2023
Glenn Maxwell and Pat Cummins registered the highest ever 8th or lower wicket partnership in ODIs. pic.twitter.com/cRaxJ9mUBv
This is one of the Greatest World Cup innings of all time. Doesn't matter whatever the Result is. This is has been one of the most grittiest innings I have ever seen Countering Unbearable pain. Maxwell F*cking hell. pic.twitter.com/rxYnfVTFSJ
— 𝕾𝖎𝖗𝕬𝖑𝖊𝖝🔰 (@TheStretford99) November 7, 2023
Maxwell Advance Man of the match 🔥🔥150#AUSvsAFG #ICCCricketWorldCup #ICCCricketWorldCup23 #ICCWorldCup2023 #AUSvsAFG #CWC23 #INDvSA #AfghanistanCricket pic.twitter.com/biMdSMyvuE
— Abdul Malik (Official) (@AbdulMa32543800) November 7, 2023
Respect 🙏🙏🙏 Maxiii #maxwell pic.twitter.com/AnseOq1hDK
— Gana Natarajan (@gana_natarajan) November 7, 2023