Gautam Gambhir On Team India vs South Africa: भारत आणि दक्षिण अफ्रिका (India vs South Africa 2nd Test) यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारताचा पराभव करत 1-0 अशी आघाडी घेतली. 22 नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण अफ्रिकेत दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. याआधी एक महत्वाची घडामोड घडली.
भारताचा कर्णधार शुभमन गिल (Shubhman Gill) दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलऐवजी ऋषभ पंत (Rishabh Pant) टीम इंडियाचं (Team India) नेतृत्व करणार आहे. पहिल्या कसोटीदरम्यान शुभमन गिलच्या मानेला दुखापत झाली होती. यानंतर शुभमन गिल पुढल्या उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाला आहे. दरम्यान, शुभमन गिलच्या दुखापतीनंतर टीम इंडियात नवीन वादळ निर्माण झालं असल्याचं बोललं जात आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) टीम इंडियातील खेळाडूंना कडक शब्दात इशारा दिला आहे.
गौतम गंभीर काय म्हणाला? (Gautam Gambhir Team India)
जिओस्टारचे क्रिकेट तज्ज्ञ आकाश चोप्रा याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. जर तु्म्हाला जास्त वर्कलोड असेल आणि विश्रांती हवी असल्यास आयपीएल सोडून द्या. कर्णधारपदाचा दबाव असेल तर कर्णधारपदही सोडून द्या...परंतु भारताकडून खेळताना फिटनेस आणि मानसिक थकवा यासारख्या समस्या कारणं असू शकत नाही, असं गौतम गंभीर टीम इंडियातील खेळाडूंना म्हटल्याचा दावा आकाश चोप्राने केला आहे.
22 नोव्हेंबर रोजी रंगणार दुसरा कसोटी सामना- (Ind vs SA 2nd Test Time)
दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबर (शनिवार) रोजी गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. गुवाहाटीतील सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरू होईल.
दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संपूर्ण संघ- (Team India Full Squad)
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, देवदत्त पडिकल, आकाश दीप आणि नितीश कुमार रेड्डी.
दुसऱ्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ- (South Africa Full Squad)
एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, देवाल्ड ब्रेव्हिस, काइल व्हेरेन (यष्टीरक्षक), सायमन हार्मर, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, कॉर्बिन बॉश, सेनुरन मुथुसामी, झुबेर हमजा आणि वियान मुल्डर.