Smriti Mandhana Announced Her Engagement: भारतीय फलंदाज (Indian Batsman) आणि वर्ल्डकप विजेत्या संघाची धुवांधार बॅटर (World Cup Winning Team's Batter) स्मती मानधनानं (Smriti Mandhana) नुकताच एक व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे. पण, स्मृतीनं एका आगळ्या-वेगळ्या मार्गानं आपल्या साखरपुड्याची घोषणा केली आहे. हा व्हिडीओ स्मृतीनं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. स्मृतीनं आपला लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड पलाश मुच्छलसोबत (Palash Muchhal) आपला साखरपुडा उरकला आहे.  

Continues below advertisement

स्मृतीनं शेअर केलल्या व्हिडीओमध्ये ती आणि तिच्यासोबत टीम इंडियाच्या धुरंधर दिसत आहेत. तसेच, सर्वांना एका क्लासिक बॉलिवूड गाण्यावर क्लासी डान्स करत स्मृतीच्या साखरपुड्याची घोषणा केलीय. या व्हिडीओमध्ये स्मृती मानधनासोबत जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयंका पाटील, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी दिसतायत. तसेच, 2006 मध्ये रिलीज झालेल्या 'लगे रहो मुन्ना भाई' सिनेमातील 'समझो हो ही गया' या गाण्यावर सगळ्याजणींनी एक गमतीशीर व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान, व्हिडीओच्या शेवटच्या फ्रेममध्ये स्मृती मानधना कॅमेऱ्यात आपल्या हातातली साखरपुड्याची अंगठी दाखवताना दिसतेय. 

यापूर्वीही दिलेली हिंट

ऑक्टोबरमध्ये इंदूर येथील स्टेट प्रेस क्लबमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पलाश मुच्छलनं स्मृती आणि त्याच्या नात्याबाबत जाहीर वक्तव्य केलेलं. तसेच, तो पुढे बोलताना म्हणालेला की, स्मृती मानधना लवकरच इंदूरची सून होईल... पलाशच्या या वक्तव्यानं मोठ्या चर्चा रंगलेल्या. पण, अद्याप दोन्ही कुटुंबीयांकडून याबाबत कोणतीही अधिक माहिती मिळालेली नाही. 

दरम्यान, स्मृती मानधना महिलांच्या भारतीय क्रिकेट संघाची धुवांधार खेळी करणारी बॅटर आहे. टीम इंडियाच्या ऐतिहासिक आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात धमाकेदार खेळी करुन उत्कृष्ट कामगिरी केली. तिनं नऊ डावांमध्ये 54.22 च्या सरासरीनं 434 धावा केल्या, ज्यामध्ये न्यूझीलंडविरुद्धचे सामना जिंकणारे शतक समाविष्ट आहे.

स्मृती मानधना कोण? (Who is Smriti Mandhana?)

22 मे 1995 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे जन्मलेले पलाश मुच्छल एका मारवाडी कुटुंबात वाढलाय, जिथे संगीत म्हणजे, जवळजवळ या कुटुंबाची मातृभाषा होती. त्याची बहीण, पलक मुच्छल एक लोकप्रिय पार्श्वगायिका आहे, पण पलाशनं खूप लहान वयातच आपली स्वतःची ओळख निर्माण केली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलेल्या पलाशनं अशा वेळी संगीत रचना करण्याचा प्रयोग सुरू केला, जेव्हा बहुतेक मुलं अजूनही त्यांच्या आवडींचा शोध घेत होती. मुच्छल भावंड त्यांच्या धर्मादाय कार्यासाठी देखील ओळखली जातात, हृदय शस्त्रक्रियेची गरज असलेल्या वंचित मुलांसाठी हे दोघे बहीण-भाऊ मोठा निधी उभारतात. आता, स्मृती लवकरच पलाशसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

तारीख ठरली, मुहूर्त काढला; सांगलीत धुमधडाक्यात पार पडणार स्मृती मानधना-पलाश मुच्छलचा लग्नसोहळा