Shubman Gill Medical Update : गुवाहाटी येथे होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघामध्ये मोठा बदल करण्यात आलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India VS South Africa) पहिल्या कसोटी सामान्यादरम्यान भारतीय कर्णधार शुभमन गिलला (Shubman Gill) कोलकातातील ईडन गार्डन्सवर मानेला दुखापत झाली होती. आता हेच कारण शुभमन गिलला संघाबाहेर ठेवण्यास कारणीभूत ठरलं आहे.
मानेच्या दुखापतीतून शुभमन गिल अद्याप बरा झाला नसल्याने तो गुवाहाटी येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भाग घेणार नाही, असे बीसीसीआयने (BCCI) अधिकृतपणे जाहीर केलं आहे. तर आता दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या कॅप्टन पदाची धुरा ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) खांद्यावर असणार आहे.
India VS South Africa : आफ्रिकेविरुद्ध कर्णधार कोण?
गुवाहाटी येथे होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी शुभमन गिलच्या जागी आता ऋषभ पंतची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. पंतला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. या अनपेक्षित, अचानक आणि महत्त्वाच्या घडामोडीमुळे क्रिकेट जगतात वेगळ्या चर्चेला सुरूवात झाली आहे. तर आता ऋषभ पंतच्या नेतृत्वात भारतीय संघ दमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. कारण कोलकाता कसोटीमध्ये भारताला 30 धावांनी पराभव स्विकारावा लागला, आणि शुभमन गिलच्या अनुपस्थितीत त्याची फलंदाजीची उणीव भारतीय संघाला जाणवली.
BCCI : बीसीसीआयचे नेमकं म्हणणं काय?
शुभमन गिलला कसोटी संघातून वगळण्यात आल्याची अधिकृत माहिती बीसीसीआयने दिली आहे. मानेच्या दुखापतीतून तो अद्याप बरा झालेला नसल्याने शुभमन गिल गुवाहाटी येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भाग घेणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत, ऋषभ पंत या महत्त्वाच्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करेल, असेही बीसीसीआयने म्हटले आहे. "दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मानेला दुखापत झालेल्या टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलला गुवाहाटी येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे. त्याच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करेल," असे बीसीसीआयच्या अधिकृत अपडेटमध्ये म्हटले आहे.
संबंधित बातमी: