Team India Head Coach Gautam Gambhir: गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची (Team India Head Coach) चर्चा रंगली आहे. सध्या भारतीय संघ टी-20 विश्वचषकात खेळत आहे. या विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. राहुल द्रविडनंतर मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड होणार, याबाबत अधिकृत काही माहिती समोर आलेली नाही.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरचं (Gautam Gambhir) नाव मुख्य प्रशिक्षकपदासाठी निश्चित झालं आहे. परंतु याचदरम्यान गौतम गंभीर एक मुलाखत दिली. या मुलाखतीमधील गौतम गंभीरचं एक विधान व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमात निवेदकाने गंभीरला विचारलं की मी टीम इंडियाच्या भावी प्रशिक्षकाशी बोलतोय का? या प्रश्नानंतर काही सेकंद शांततेत गेली. गंभीरने विचार केला, तो हसला आणि त्याने उत्तर दिलं.
गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला की, सध्या या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. मी इतका पुढचा विचारही करत नाही. सध्या मी एवढेच सांगू शकतो की मी जिथे आहे तिथे मी आनंदी आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला की, सध्या या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. मी इतका पुढचा विचारही करत नाही. सध्या मी एवढेच सांगू शकतो की मी जिथे आहे तिथे मी आनंदी आहे, असंही गौतम गंभीर म्हणाला.
जॉन्टी रोड्स यांचा फिल्डिंग कोचसाठी अर्ज-
दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि महान क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्स यांनी भारतीय संघाचे फिल्डिंग कोच होण्यासाठी अर्ज केला आहे. त्यांनी 2019 लादेखील फिल्डिंग कोचसाठी अर्ज केला होता. मात्र त्यावेळेचे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आर. श्रीधर यांना पहिली पसंती दिली होती. सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी टी. दिलीप यांची फिल्डिंग कोच म्हणून निवड केली होती. जॉन्टी रोड्स सध्या लखनौ सुपर जायंट्सचे फिल्डिंग कोच आहेत.
गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय कारकीर्द -
गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय करियर शानदार राहिलेय. त्यानं टीम इंडियासाठी 147 व-नडे सामने खेळले आहेत, त्यामध्ये 5238 धावा केल्या आहेत. वन-डेमध्ये गौतम गंभीरने 11 शतके आणि 34 अर्धशतके ठोकली आहेत. गौतम गंभीर टीम इंडियासाठी 58 कसोटी सामने खेळलाय, यामध्ये 4154 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने 9 शतके आणि 22 अर्धशतके ठोकली आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने द्विशतकही ठोकलेय. गौतम गंभीर याने 37 टी 20 सामनेही खेळले आहेत. यामद्ये 932 धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान सात अर्धशतके ठोकली आहेत. 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजयात गौतम गंभीरचाही मोठा वाटा राहिला आहे.