Abdul Razzaq On Babar Azam : भारतात होत असलेल्या विश्वचषकात पाकिस्तान संघाची कामगिरी अतिशय खराब सुरु आहे. पाकिस्तान संघाचा लागोपाठ तीन सामन्यात पराभव झाला. अफगाणिस्तानविरोधात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर बाबर आझम याला ट्रोल केले जात आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनीही पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत. फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग या तिन्ही विभागात पाकिस्तान संघ कमकुवत असल्याचे दिसत आहे. त्यात कर्णधार बाबर आझम याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उडत आहे. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू अब्दुल रज्जाक यानेही बाबर आझमचा समाचार घेतला आहे. बाबर आझमला षटकार मारता येईना, हा कसला नंबर एकचा फलंदाज... असे म्हण अब्दुल रज्जाक याने कानउघाडणी केली. 


बाबर आझम आयसीसी फलंदाजीच्या क्रमवारीत सध्या पहिल्या स्थानावर आहे. पण त्याला विश्वचषकात अद्याप लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. तीन सामन्यात तो फ्लॉप गेलाय. भारत आणि अफगाणिस्तानविरोधात अर्धशतके ठोकली, पण संथ गतीने फलंदाजी केली. त्यावरुन त्याच्यावर टीकेची झोड उडत आहे. अब्दुल रज्जाक याने बाबरचा समाचर घेतला. पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीवर त्याने बाबर आझमचा खरपूस समचार घेतला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडिवर व्हायरल झालाय. 






अफगाणिस्तानविरोधात आठ विकेटने पराभव झाल्यानंतर अब्दुल रज्जाक याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये तो म्हणाला की, हा कोणता नंबरचा एकचा फलंदाज, याला षटकारही मारता आला नाही...  रज्जाकचा हा व्हिीडओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये वेगवान गोलंदाज  मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम हे ही दिसत आहेत. 


पाकिस्तानी टिव्ही शो ‘हंसना मना है’ या कार्यक्रमात बोलताना अब्दुल रज्जाक याने बाबर आझमच्या कामगिरीवर ताशेरे ओढले. तो म्हणाला की,   “मी तर पहिल्यांदाच म्हटले होते, हा कसला नंबर एकचा फलंदाज, त्याला सरळ षटकारही मारता येत नाही. बाद झालेल्या चेंडूवरील त्याचा बॅलेंन्स पाहा... मुळात तो बाद होणारा चेंडूच नव्हता. तो नूर अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला, जो पदार्पण करत होता... बाबर आझमने 92 चेंडूत 74 धावा केल्यात. चेंडू आणि धावांमधील फरकही पाहा... ”