India vs New Zealand Mumbai Test : भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा संघात परतत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये (Second Test) विराट संघात असणार आहे. शुक्रवारी (3 डिसेंबर) मुंबईच्या वानखेडे (Wankhede Stadium) येथे हा सामना सुरु होणार असून यावेळी नेमके कोण 11 खेळाडू संघात असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत कर्णधार विराटने दिलेल्या माहितीनुसार निर्णय घेणं फार अवघड नसल्याचं मत त्याने दिलं आहे.


कोहली छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा संघात परतणार आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीमध्ये खेळवण्यात आलेल्या संघातील कोणत्यातरी एका खेळाडूला संघाबाहेर बसावं लागणार आहे. दरम्यान संघ व्यवस्थापन, कोच राहुल आणि विराट यांना मिळून हा निर्णय घ्यावा लागणार आहे.  याबाबत कोहलीने गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सींगमध्ये दिलेल्या माहितीत म्हटले की,"आगामी कसोटी संघ निवडताना प्रत्येक खेळाडूचा फॉर्म तसंच सामना होणाऱ्या मैदानातील आतापर्यंतची खेळी या साऱ्यांचा विचार करावा लागणार आहे. यावेळी एक संघ म्हणून काम करताना सर्वांवर विश्वास ठेवणंही महत्त्वाचं आहे. संघातील प्रत्येक खेळाडूचा एकमेंकावर विश्वास असून सर्व मिळून योग्य निर्णय घेतील"


'या' तिघांजागी कोहलीची एन्ट्री शक्य


पहिल्य़ा कसोटीनंतर संघाची स्थिती पाहता विराटला जागा सलामीवीर मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या जागी मिळू शकते. कारण या तिघांनाही पहिल्या सामन्यात खास कामगिरी करता आली नाही. याउलट सलामीचा सामना खेळणाऱ्या श्रेयसने मात्र पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं होतं. त्यामुळे पुजारा, रहाणे आणि अगरवाल यांच्यातील एकाला संघाबाहेर जावं लागणार हे निश्चित. 


विराटसाठी वानखेडे 'लकी'


भारतीय कर्णधार विराटने मागील दोन वर्षांपासून एकही शतक झळकावलेले नाही. दरम्यान आता न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत तो शतक झळकावेल अशी साऱ्यांचीच इच्छा आहे. त्यात वानखेडे मैदानात शेवटचा कसोटी सामना खेळला असताना विराटने द्विशतक झळकावले होते. त्यामुळे तो यंदाही चांगली कामगिरी करेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. 


संबधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha