FIR On Mitchell Marsh : अहमदाबादच्या रणांगणात ऑस्ट्रेलियाने भारताचा सात विकेटने पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले होते. सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शचा विश्वचषकासोबतचा फोटो व्हायरल झाला होता. त्याने वर्ल्डकपवर चक्क पाय ठेवला होता, त्यामुळे भारतीयांसोबत क्रीडा चाहत्यांच्या भावना दुखावल्या होत्या. याप्रकरणी मिचेल मार्शच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मिचेल मार्शविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त एका सोशल मीडियावर युजरने म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातील एका आरटीआय कार्यकर्त्याने मिशेल मार्श याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की, मिचेल मार्शने ज्या प्रकारे विश्वचषक ट्रॉफी आपल्या पायाखाली ठेवली, त्यामुळे भारतीय चाहत्यांच्या भावना दुखावल्या, असं एक्सवर @_FaridKhan (ट्विट) या युजरने म्हटलं होतं.
चुकीच्या वृत्ताबद्दल खेद
मिचेल मार्शचा विश्वचषकावर पाय ठेवल्याचा फोटो व्हायरल झाला होता. मार्शच्या या कृत्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली होती. त्यानुसार एबीपी माझाने हे वृत्त प्रसिद्ध केलं होतं. मात्र हे वृत्त चुकीचं असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे चुकीच्या वृत्ताबद्दल आम्हाला खेद आहे.
मिशेल मार्शवर चाहते भडकले -
19 नोव्हेंबर रोजी पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वनडे विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला. त्यानंतर मिचेल मार्शचा एक फोटो व्हायरल झाला. सोप्यावर बसलेल्या मिचेल मार्शच्या हातात बिअर आणि पायात वर्ल्ड कप ट्रॉफी होती. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. मिचेल मार्शच्या या कृतीमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या.
मिचेलच्या फोटोवर चाहत्यांचा संताप
विश्वचषकाची ट्रॉफी सहाव्यांदा उचलल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ट्रॉफीला जवळ घेत फोटो शेअर केले. पण मिचेल मार्शच्या या फोटोने मात्र ऑस्ट्रेलियांच्या खेळाडूंवर टीकेची झोड उठलीये. ऑस्ट्रेलियाने 2023 चा विश्वचषक जिंकला.पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने अंतिम फेरीत भारताचा पराभव केला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकली. मात्र, सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शच्या हातात बिअर आणि त्याचे पाय विश्वचषकावर आहेत. मिचेल मार्शच्या या लज्जास्पद कृत्यामुळे क्रिकेट चाहते संतापले होते. मिचेल मार्शवर क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर टीका केली.
फायनलमध्ये भारताचा पराभव -
विश्वचषकात टीम इंडियाने वर्चस्व गाजवले होते. सलग दहा सामने जिंकून विश्वचषक विजयासाठी दावा ठोकला होता. पण 19 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधात भारताचा पराभव झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाचे तिसऱ्यांदा विश्वचषक चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले. त्याचबरोबर कांगारूंनी सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकली.
आणखी वाचा :
Mitchell Marsh: हातात बिअर आणि विश्वचषकावर पाय;मिचेल मार्शच्या लज्जास्पद कृत्यामुळे चाहते संतापले